मुंबई : शिवसेनेतून शिंदे गटाने बंडाळी केल्यानंतर शिवसेनेत (Maharashtra politics) पक्षाचे दोन गट पडले आहेत. यानंतर दोन्ही गटांनी पक्षाच्या चिन्हावर (Shiv Sena election symbol dispute) दावा केला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने (Election Commission of India) हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह दोन्ही गोठवले होते. त्यामुळं शिवसेनेला मोठा फटका बसला आहे.
[read_also content=”उद्या ठाकरे गटाची सांयकाळी पाच वाजता बैठक, महामोर्चाचा अंतिम मार्ग ठरवला जाणार https://www.navarashtra.com/maharashtra/tomorrow-the-thackeray-group-meeting-final-route-of-the-mahamorcha-will-be-decided-352703.html”]
दरम्यान, आता या चिन्हाच्या वादावर निवडणूक आयोगासमोर उद्या (12 डिसेंबरला) पहिली सुनावणी (shiv sena symbol news) होणार आहे. दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपापली कागदपत्रं आणि निवेदनं 9 नोव्हेंबर रोजी सादर केले आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही गटांना स्वतंत्र नावे व चिन्हे वाटप करण्यात आली होती. यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव देण्यात आले, तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले.
यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह म्हणून धगधगती मशाल मंजूर केली तर शिंदे गटाला दोन तलवारी आणि एक ढाल निवडणूक चिन्ह देण्यात आले. दरम्यान, आता या ठाकरे गट व शिंदे गट या दोघांच्या चिन्ह वादावर निवडणूक आयोगासमोर उद्या (12 डिसेंबरला) पहिली सुनावणी (shiv sena symbol news) होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.