मुंबई : भाषणात ढसाढसा रडलेले शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) शिंदे गटात (Shinde Group) सामिल झाले आहेत. त्यामुळे बहुमत चाचणीआधी (Majority Test) शिवसेनेला धक्का मानला जात आहे. शिवसेनेत बंड (Rebel) झाल्यानंतर संतोष बांगर यांनी भावनिक भाषण करत ढसाढसा रडले (Cried Loudly) होते. त्याशिवाय, त्यांनी आपल्या जिल्ह्यात बंडखोरांविरोधात जाहीर भूमिकाही घेतली होती. आता बांगर यांनी घेतलेल्या यु-टर्नमुळे (U-Tern) शिवसेनेला धक्का बसला आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधातच बंड केल्यानंतर काही मोजकेच आमदार शिवसेनेसोबत कायम राहिले होते. यामध्ये आता बांगर यांचाही समावेश होता. संतोष बांगर यांनी बंडखोरीविरोधात भूमिका घेतल्याने शिवसैनिकांनी त्यांना मोठा पाठिंबा दिला होता. त्यांच्या नेतृत्वात मोठे मोर्चेही झाले होते. मात्र, आज बहुमत चाचणीआधीच बांगर यांनी शिवसेनेची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. बांगर हे हिंगोलीतील (Hingoli) कळमनुरीचे (Kalamnuri) आमदार आहेत. शिंदे गटातील शिवसेनेच्या आमदारांची संख्या ४० वर गेली आहे.