मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) पाचवा आणि शेवटचा टप्पा आज (दि.20) पार पडत आहे. सकाळपासून यासाठी मतदान सुरु झाले आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्यानुसारच, अनेक संस्थांकडून सवलतीही दिल्या जातात. असे असताना मतदारांनी शाई लावलेले त्यांचं बोट दाखवले तर त्यांना स्विगी डाईन आऊटवर 50 टक्क्यांची सूट मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर आता शेवटच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यातच राज्यातील राजकारणात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या टप्प्यात भाजपचे देखील उमेदवार असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
त्यानुसारच, मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी आता मतदारांनी शाई लावलेले त्यांचं बोट दाखवले तर त्यांना स्विगी डाईन आऊटवर 50 टक्क्यांची सूट मिळणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यावा हा या मागचा उद्देश आहे. स्विगी डाइन आऊटने मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी एक आकर्षक ऑफर आणली आहे.