कल्याण : खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेच्या निवडणूकीत विजयाची हट्रिक केली आहे. यावेळी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, तिसऱ्यांदा जनतेने विश्वास दाखविला आहे. महायुतीवर माझ्यावर आज जो विश्वास दाखविला आहे. आज तिसऱ्यादा देखील जे प्रेम २०१४, २०१९ आणि आता देखील तिसऱ्या वेळी देखील मोठ्या बहुमताने लोकांनी कल्याण लोकसभेसाठी जिंकुन दिले आहे.
सर्व शिवसेना, राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, मनसे, आरपीआय असेल सगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दोन महिने मेहनत केली. उल्हासनगर मधील, टीओके असेल साई पार्टी असेल वेगवेगळ्या पक्षांनी एकत्र येऊन काम केले. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी विश्वास दाखविला आणि मला तिसऱ्यांदा निवडणूक लढण्याची संधी दिली. आणि मला तिसऱ्यांदा मोठे मत्ताधिक्य या कल्याण लोकसभा निवडणुकीत मिळालं असल्याची प्रतिक्रिया यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
[read_also content=”बारामती मध्ये शरद पवारच ठरले पॉवरफुल! एक लाख ५३ हजार मताधिक्याने सुप्रिया सुळे यांचा विजय अजित पवारांना मतदारांची चपराक https://www.navarashtra.com/maharashtra/lok-sabha-elections-result-2024-baramati-candidated-supriya-sule-win-over-suntra-pawar-maharashtra-politics-nrpm-542776.html”]
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे निवडणून आले आहेत. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध वैशाली दरेकर असा सामना रंगला होता. पण या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांनी बाजी मारली. निवडणुकीच्या निकालानंतर श्रीकांत शिंदेनी मतदारांचे आभार मानले. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वच मतदार संघात जोरदार लढत झाली होती. महायुतीकडून उमेदवारांचा प्रचार करण्यात आला होता.