Sindhudurg Crime : अवैध्यरित्या गुटखा विक्रीवर गुन्हेशाखेची मोठी कारवाई ; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
सिंधुदुर्ग/ संजय वालावलकर : गुटखा विक्रीवर गुटखा विक्रीवर बंदी असताना देखील अवैध्यरित्या गुटखा आणि पानमसाल्याचे वाहतुक व विक्रीवर धडक कारवाई सुरू केली आहे. गुन्हेअन्वेषण शाखेमार्फत गोपनीय अहवाल माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे. ओटवणे वायंगणी सह अनेक ठिकाणी धाड टाकूनआतापर्यंत साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि पानमसाल्याचे वाहतुक व विक्रीवर कारवाई करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व मा. अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांना सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतर्फे गुटखा व पानमसाल्या संदर्भात गोपनीय माहिती काढणे सुरु होते.आतापर्यंत साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मौजे चराठे ते ओटवणे जाणारे रोडवर, ता. सावंतवाडी येथे सायंकाळी सापळा रचून आरोपी क्र. 01) बाबाजी विजय नाईक, वय- 42, रा. खासकीलवाडा, ता. सावंतवाडी व आरोपी क्रमांक 02) उमेश रघुनाथ सावंत, वय- 50, रा. वायगंणी, पटवाडी, ता. मालवण यांना निळया रंगाची अल्टो कार क्र. MH-04-ED-9116 सह ताब्यात घेतले. त्यांचे ताब्यातून अवैध रित्या वाहतूक करीत असलेला 2,38,100/- रुपये (दोन लाख अडतीस हजार शंभर रुपये) किंमतीचा स्टार, विमल व माणिकचंद गुटखा, पानमसाला तसेच 1,00,000/ रुपये किंमतीची अल्टो कार असा एकुण 3.38,100/- रुपये (तिन लाख अडतीस हजार शंभर रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील कारवाई सुरु असुन तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, श्री. कृषिकेश रावले, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री. समीर भोसले, व पोलीस अंमलदार गुरुनाथ कॉयडे, प्रकाश कदम, जयेश सरमळकर यांनी केलेली आहे.यापुढे देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसालाचे वाहतुक व विक्रीवर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे कडक कारवाई करणे सुरु राहणार आहे असं सांगण्यात आलं आहे.