Sarita Khanchandani (Photo Credit- X)
Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध समाजसेविका सरिता खानचंदानी (Sarita Khanchandani) यांनी त्यांच्या राहत्या घराच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. त्यांच्या उडी मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गुरुवारी दुपारी १ वाजता खानचंदानी ह्या रोमा इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून खाली उडी घेऊन त्या गंभीर जखमी झाल्या. तातडीने त्यांना बालाजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर मॅक्सिलाइफ रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढे डोंबिवली येथील एम्स रुग्णालयात रेफर करण्यात आलं.
उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण उल्हासनगर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या संदर्भात, कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवून पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.
ठाणे जिले के उल्हासनगर में एडवोकेट सरिता खानचंदानी ने आज अपनी बिल्डिंग से कूदकर आत्महत्या कर ली.बहुत ही शर्मनाक 😗 pic.twitter.com/tCtStuZuKr
— Krishna Kant Mishra (@KKMishraOffice) August 28, 2025
ॲड. सरिता खानचंदानी या ‘हिराली फाउंडेशन’ या एनजीओच्या संस्थापक होत्या. त्यांनी ध्वनी प्रदूषणाविरोधात दीर्घकाळ कायदेशीर लढा दिला. शहरात रात्री उशिरापर्यंत वाजणारे डीजे, मिरवणुकांमध्ये नियमबाह्य डेसिबल आवाज, यामुळे होणारे ध्वनीप्रदूषण याविरोधात त्यांनी न्यायालयीन कारवाई केली. त्यांच्या पुढाकारामुळे शहरातील ध्वनी प्रदूषण कमी करण्यात मोठं यश मिळालं.
तसेच त्यांनी वालधुनी नदी प्रदूषण विरोधातही अनेक याचिका दाखल करून नागरिकांना स्वच्छ पर्यावरण मिळावं यासाठी प्रयत्न केले. पर्यावरण प्रेमी असलेल्या सरिता खानचंदानी यांच्या जाण्यामुळे त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्याने उडी मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.