Gadchiroli News: एसटी बसस्थानकांचा होणार कायापालट! परिवहन विभागाने हाती घेतली नवीन मोहीम
BMC Election Result 2026: फूट आणि फटका, तरीही ठाकरेंचा झुंजार लढा; मुंबईतील ६५ जागांचा खरा अर्थ काय?
सोलापूर येथील बसस्थानकाला भेट देऊन परिवहनमंत्र्यांनी पाहणी करून कारवाईचा बडगा उगारला होता, अशी परिस्थिती इतर ठिकाणच्या बसस्थानकांमध्ये देखील कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळते. त्यामुळे दर १५ दिवसांनी बसस्थानक स्वच्छता परिसरात राबविण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. या स्वच्छता मोहिमेतून बसस्थानकातील बैठक व्यवस्था, लादी, भिंती, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, महिला विश्रांतीगृहे, फलाट, कार्यालयीन कक्ष, शौचालयांची सफाई होणार असून रापमच्या प्रशासकीय इमारतीमधील कार्यालय स्वच्छ करण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
दर १५ दिवसाला स्वच्छता मोहिमेची अंमलबजावणी प्रत्येक बसस्थानकावर काटेकोरपणे होईल, याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र डबे उपलब्ध करून कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने महामंडळाचे नियोजन सुरू आहे.
जिल्ह्यातील सर्व स्थानकांत महिन्यातून दोनदा स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत रापमच्या मध्यवर्ती कार्यालयाने निर्देश दिले आहेत. यामध्ये बसस्थानकाच्या परिसरातील बॅनरची गर्दी हटविण्यात येणार आहे. यामुळे बकाल परिसर स्वच्छ होणार आहे. भिंतीवर लावलेले जाहिरातीचे पोस्टर काढून परिसर स्वच्छ व चकचकीत ठेवण्यावर भर दिला जाणार असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. या मोहिमेमुळे एसटी बसस्थानके अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि प्रवाशांसाठी आनंददायी ठरणार आहे.
KDMC Election: केडीएमसी निवडणूक रणधुमाळी! २० उमेदवार बिनविरोध तर उद्या उर्वरित जागांचा निकाल
राज्य परिवहन विभागाने आदेश जारी केले आहे. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच बसस्थानके स्वच्छ करण्यात येणार आहे. महिन्यातून दोनदा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या स्वच्छते मोहिमेमुळे एसटी बसस्थानके अधिक स्वच्छ, आरोग्यदायी व प्रवाशांसाठी आनंददायी ठरणार आहे.- अशोककुमार वाढीभस्मे, विभागीय नियंत्रक






