मुंबई: पुढील दोन दिवसांत एसटीचे १०० टक्के कर्मचारी कामावर रुजू होतील आणि महाराष्ट्राची लालपरी (ST Bus) पूर्णपणे सुरु होईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली. अनिल परब म्हणाले की, सध्या राज्यातील एसटीची ९० टक्के सेवा सुरु झाली आहे. (MSRTC) येत्या दोन-तीन दिवसात पूर्ण सेवा सुरु होईल. एसटीचे ७० हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ८२ हजारांच्या आसपास आहे. तसेच राज्यातल्या अनेक आगारात १०० टक्के कर्मचारी (ST Workers) कामावर परतले आहेत. त्यामुळे उर्वरित कर्मचारी देखील येत्या दोन दिवसात कामावर परततील आणि राज्यातली एसटीची सेवा पूर्णपणे सुरु होईल. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना फायदे दिले असल्याचेही ते म्हणाले.
[read_also content=”‘पोलखोल’ यात्रेमुळे मुंबईत राडे सुरुच; भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते पुन्हा आमने सामने आले https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-shiv-sena-activists-clash-again-in-mumbai-over-polkhol-yatra-nrvk-271349.html”]
एसटीच्या संपामुळे एसटीसह महाराष्ट्राचं मोठ नुकसान झालं आहे. तसेच २२ एप्रिलपर्यंत कामावर येणाऱ्या कामगारांवर कारवाई होणार नाही, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांना लुटलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांशी सदावर्ते खेळले, असे आरोपही अनिल परब यांनी केले आहेत.