Sugar Price Drop : सणासुदीच्या दिवसांत जळगावकरांना दिलासा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
दर कमी होण्यामागे सरकारचा निर्यात शुल्काबाबतचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. शुल्क कमी झाल्यानंतर बाजारातील साखरेच्या उपलब्धतेवर परिणाम झाला असून, व्यापाऱ्यांकडील मालही बाजारात येऊ लागल्याचे चित्र आहे. दर वाढतील या अपेक्षेने काही व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात साखर साठवून ठेवल्याची चर्चा होती. मात्र, आता परिस्थिती बदलल्याने असा साठा बाजारात आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण करून दर वाढवण्याच्या प्रयत्नांनाही काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे.
साखरेचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पुढील काळात भाव किती स्थिर राहतात याकडे लक्ष राहणार आहे. सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढत असल्याने बाजारातील दरांमध्ये पुन्हा चढ-उतार होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सध्या जळगावच्या बाजारात किरकोळ दर ७० रुपये, तर घाऊक दर ६६ रुपये किलोच्या आसपास आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी वाढलेल्या भावामुळे चिंतेत असलेल्या ग्राहकांना तूर्तास थोडा दिलासा मिळाला आहे.
Jalgaon News: जवानांच्या मनगटावर बांधला जाणार अभिमानाचा धागा …
सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढत्या दरामुळे चिंतेत असलेल्या ग्राहकांना जळगावातून काहीसा दिलासा मिळाला आहे. किरकोळ बाजारातील साखरेचा दर 75 वरून सुमारे ₹70 प्रति किलोवर आला आहे. तर घाऊक बाजारात दर सुमारे 66 प्रति किलो असल्याचे सांगितले जात आहे. केंद्र सरकारच्या साखरेवरील निर्यात शुल्क शून्य करण्याच्या निर्णयानंतर बाजारातील उपलब्धता वाढल्याने दर कमी झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत …






