जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 15 दिवसांची मुदतवाढ
राज्य निवडणूक आयोगाने मागितली होती मुदतवाढ
कोर्टाचा राज्य निवडणूक आयोगाला दिलासा
Maharashtra Politics: राज्य निवडणूक आयोगाला कोर्टाने ‘सुप्रीम’ दिलासा दिला आहे. जिल्हा परिषद निवडणुका घेण्यासाठी कोर्टाने निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी आयोगाला मुदतवाढ दिली आहे. निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
आमच्याकडे इव्हीएम मशीनची संख्या कमी आहे. त्यामुळे आम्हाला निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी विनंती निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाकडे केली होती. सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. मात्र मुदतवाढ मिळण्यासाठी निवडणूक आयोगणे सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता.
12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपुढे वाढवलेली नाही त्या ठिकाणी मुदतवाढ देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने केली होती. त्यावर आता सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाला दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
बातमी अपडेट होत आहे…






