बुलढाणा- राजकीय नेते कोणत्या थराला जाऊन काय बोलतील याचा नेम नाहीय, देशात हिंदू-मुस्लीम (hindu muslim) प्रश्नांवर सतत चर्चा होत असते. या दोन्ही धर्मातील हक्क, अधिकार, आरक्षण, लोकसंख्या आदीवर बोललं जातं. मात्र आता संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) एका नेत्यांने चक्क मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा अजब सल्ला दिला आहे. भारतातील मुस्लिमांना ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत कोणत्याही निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असणार नाही, असा कायदा करा. त्यानंतर निवडणूका घ्या. मग पाहा तुम्हाला किती मतदान पडते. संभाजी ब्रिगेडचे नेते पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar )यांनी भाजपवर (BJP) टीका करताना हे वक्तव्य केले आहे.
[read_also content=”आज राज्यभरात एमपीएससी विद्यार्थांचं आंदोलन… पुण्यातील अलका चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात https://www.navarashtra.com/maharashtra/protest-of-mpsc-students-across-the-state-today-heavy-police-deployment-at-alka-chowk-in-pune-361377.html”]
मग कायदा करा…
दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे नेते पुरुषोत्तम खेडेकर यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सिंदखेड राजा येथे सभेला संबोधित करताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. या देशातील शंभर टक्के मुसलमान तुम्हाला हिंदू धर्माचे विरोधक आणि शत्रू वाटतात. या देशाचे संविधान पाहिजे तसे बदलण्याचे अधिकार तुमच्या हातात आहे. मग एक कायदा करण्याचा सल्ला देखील खेडेकर यांनी दिला आहे.
मग बघू तुम्ही कसे जिंकता?
पुढे बोलताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी भाजपला आव्हान दिले आहे. तसेच यावेळी त्यांना भाजपावर सडकून टिका करताना म्हणाले की, भारतातील मुस्लिमांना ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत कोणत्याही निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार न देण्याचा कायदा करा. मग बघूया तुम्ही निवडणुकीच कसे जिंकता? असं खेडेकर यांनी भाजपला आव्हान दिलं आहे, त्यामुळं यावर भाजपाकडून प्रतिउत्तर येण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारवर जोरदार टिका केली. आपले तिकडचे सरकार बहुजन बदमाश आणि बिनडोक आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी भाजपवर केली.