संग्रहित फोटो
शहरातील घरभाडे, वीज-पाणी बिले, प्रवास खर्च, मुलांचे शिक्षण, घरखर्च अशा मूलभूत गरजा पूर्ण करताना शिक्षक हैराण झाले आहेत. वेळेवर वेतन न मिळाल्याने कुटुंबाचा खर्च भागवणे अशक्य होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. काही शिक्षकांना कर्ज काढावे लागत असून, काहींनी दैनंदिन खर्चासाठी भिशी, उधारी व क्रेडिटवर अवलंबून राहावे लागत आहे.
यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. वारंवार आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात पगार जमा झालेला नाही. त्यामुळे शिक्षकांचा संयम सुटत चालेला आहे. महापालिका प्राथमिक शिक्षण विभागशी संपर्क साधला आसता बोलण्यास नकार दिला.
शिक्षकांचे गाऱ्हाणे
महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहे, पण पगार न झाल्यामुळे घरभाडे, वीज-पाणी बिले, प्रवास खर्च, मुलांचे शिक्षण, घरखर्च या गोष्टीना सामोरे जावे लागत आहे. आम्ही मुलांना शिकवावे कि पैशांची चिंता करावी कळत नाही. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर थकलेला पगार मिळावा हि विनंती आहे. शहरात राहण्यासाठी दरमहा किमान १५ ते २० हजार खर्च ठरलेलाच असतो. परंतु तीन महिने वेतन न मिळाल्याने मानसिक तणाव सहन करावा लागत आहे, असे गाऱ्हाणे शिक्षकांनी मांडले.






