मुंबई : ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी एक म्हण आहे. सध्या याचा प्रत्यय मध्य रेल्वेच्या (Central railway) मार्गावर पाहयला मिळत आहे. पावसाला (Rain) सुरुवात होते न होते तोच मध्य रेल्वेच्या गाड्यावर (Central railway local train) याचा परिणाम दिसत आहे. आज पुन्हा एकदा मध्य रेल्वे उशिराने धावत आहे. (Today also Central railway local train late) ते पावसामुळं नसून शहाड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड (Technical problem due to Central railway local train late) झाल्यामुळं मध्य रेल्वे उशिराने धावत आहे. त्यामुळं प्रवाशांना त्रासाला सामोरी जावे लागत असून, मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे.
[read_also content=”हेल्मेट काढण्यास गेलेल्या कामगारावर काळाचा घाला; पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/a-worker-died-after-collapsed-from-5th-floor-in-pune-nrka-301932.html”]
मध्य रेल्वेच्या शहाड रेल्वे स्थानकात मालगाडीच्या डब्याचे कँपलिंग तुटल्याने कल्याणकडे जाणरी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. शहाड रेल्वे (Shahad station) स्थानकात शुक्रवारी दुपारी १२.२४ वा.सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (CSMT) जाणाऱ्या मालगाडीच्या डब्याचे कँपलिंग शहाड रेल्वे स्थानकात तुटल्याने सुमारे २० मिनिटे कल्याणच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करीत मालगाडी रवाना केल्याची सध्या माहिती समोर येत आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे तसेच रेल्वे प्रवाशांनी सहकार्य केले असल्याचे शहाड रेल्वे स्टेशन मास्टर अमोल खरात यांनी संपर्क साधला असता सांगितले.
दरम्यान, मुंबईकरांना सकाळा व दुपारी कार्यालय गाठण्याची घाई असते. आणि अशा गर्दीच्या वेळी लोकल उशिराने धावत असल्यामुळं प्रवाशांचा खोळंबा होत असून, प्रवाशांना त्रासाला सामोरी जावे लागत आहे. त्यामुळं प्रवाशी मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभार व नियोजनावर लाखोली वाहत आहेत.