सोगाव : काल मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास अलिबाग रेवस मार्गावर आरसीएफ गेट समोर थार कार आणि डंपरएकमेकांना धडकले. यामध्ये कार चालक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
अलिबाग रेवस मार्गावर आरसीएफ गेटसमोर मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अलिबागकडून रेवस बाजूकडे जाणाच्या डंपरला नवगाव येथील पंकज दिपक घरत यांनी अलिबाग कडून रेवस बाजूकडे जात असताना आपल्या थार कार (एच.एच.०६ सि एल ०७४९) ने डंपरला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे अपघात झाला, या अपघातामध्ये गाडीची जबरदस्त ठोकर लागून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सुदैवाने कार चालकाच्या जीवावर न बेतता तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला ग्रामस्थांच्या सहकार्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर डंपर चालक सुखरूप असून डंपरचेही नुकसान झाले आहे. या अपघाताबाबतीत अलिबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत.