ठाणे, बोरिवलीतील वाहतूक कोंडी दूर होणार! २०२८ पर्यंत ट्विन टनल सेवेत दोखल होणार
दुहेरी बोगद्याच्या कामासाठी चार टीबीएम यंत्रांचा वापर करण्यात येणार असून या टीबीएमची बांधणी चेन्नईतील ‘हेरेनकनेट कंपनीत केली जात आहे. यापैकी दोन टीबीएम मुंबईत दाखल झाले असून पहिल्या टीबीएमचे नाव ‘नायक’ आहे. नायक’ टीबीएम ठाण्यातून बोरिवलीच्या दिशेने भुयारीकरण करणार आहे. या टीबीएमच्या जोडणीचे काम सध्या ठाणे लॉन्चिंग शाफ्ट येथे सुरू आहे.
जोडणी पूर्ण करून मार्च २०२६ मध्ये भुवारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अंदाजे ११० सुट्ट्या भागांमध्ये टीबीएम आणण्यात आले असून सुझ्या भागांची जोडणी झाल्यानंतर ते भूगर्भात सोडण्यात येणार आहेत. दुसऱ्या टीबीएमचे नाव ‘अर्जुन’ असून हे टीबीएम बोरिवलीच्या लॉन्चिंग शाफ्टमध्ये सोडण्यात येणार आहे.
बोरिवली आणि ठाणे प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएने एकूण सहा मार्गिकांचा ११.८ किमी लांबीचा ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला. यात १०.२५ किमी लांबीचे दोन बोगदे असणार असून हे बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत.
हा प्रकल्पासाठी अंदाजे १८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प पूर्ण होऊन प्रवासी वाहतुकीस खुला झाल्यास ठाणे बोरिवली अंतर केवळ १२ मिनिटांत पार करता येणार आहे. यामुळे ठाणे, बोरिवलीतील वाहतूक कोंडी दूर होणार आहे.
प्रत्येक टनेलमध्ये 3 लेन असतील आणि तो 23 मीटर खोलीवरून जाईल. तसेच या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीचा मोठा भार कमी होणार आहे. सध्या ठाणे ते बोरीवली हा 23 किमीचा प्रवास सुमारे 1 तासाहून अधिक वेळ घेतो. मात्र, टनेल पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या 12 किमीवर येईल आणि केवळ 15 मिनिटांत शक्य होईल.घोडबंदर रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल. प्रवासी कमी वेळेत आणि अधिक सोयीस्करपणे प्रवास करू शकणार आहे.
Ans: ठाणे-बोरिवली प्रकल्पात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) खाली ११.८ किमी लांबीचे दोन समांतर तीन-लेन बोगदे बांधण्याचा समावेश आहे. एकदा हे बोगदे पूर्ण झाल्यावर, घोडबंदर रोडला पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडतील, ज्यामुळे सध्याचा ६० ते ९० मिनिटांचा प्रवास सुमारे १५ मिनिटांवर येईल.
Ans: पॅकेज २ अंतर्गत, ठाणे आणि बोरिवली दरम्यान ६.५ किमी लांबीचा बोगदा बांधला जाईल . पॅकेज ३ मध्ये मार्गावर वायुवीजन प्रणाली आणि इतर उपकरणे बसवण्यात येतील. एमएमआरडीएने हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
Ans: पातालपाणी रेल्वे बोगदा (१४ किमी) भारतात जगातील सर्वात लांब रेल्वे बोगद्यांपैकी एक आहे. २०२५ मध्ये कार्यान्वित होण्यासाठी सज्ज असलेला, पातालपाणी रेल्वे बोगदा ४९ किमी लांबीचा आहे आणि तो भारताच्या मध्यभागी, मध्य प्रदेशात स्थित आहे.






