फोटो सौजन्य AI
सौदी अरेबियाच्या या विशाल सरकारी तेल कंपनीचे समायोजित निव्वळ उत्पन्न वार्षिक ३३ टक्क्यांनी वाढून ३३.४ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हे उत्पन्न केवळ २५.२ अब्ज डॉलर्स नोंदवले गेले होते. इतकेच नव्हे, तर कंपनीचा नोंदवलेला निव्वळ नफाही ४४ टक्क्यांच्या प्रचंड वाढीसह ३२.६९ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.
होर्मूझ बंद आणि हुतींनी लाल समुद्रात केलेल्या ब्लॉकेड मुळे अरामको या जगातील सर्वात मोठ्या तेलाच्या कंपनीला तेल पुरवठा करण्यात अडथळे निर्माण झाले . दिवसेंदिवस होणारी वाहतुकीची नाकेबंदी यासाठी सऊदी अरब ने आता होर्मूझ ला बायपास करून ईस्ट वेस्ट किनाऱ्यालगतच्या आपल्या तेल वाहून नेणाऱ्या पाइपलाइन्स यांचा वापर करायला सुरवात केली . ही पाईपलाईन पूर्वेकडील प्रदेशांना लाल समुद्राच्या किनाऱ्यावरील यानबू बंदराशी जोडून तेल निर्यात सुरक्षित करते.कंपनीने या पर्यायी मार्गाची पूर्व-पश्चिम पाइपलाइन नेटवर्कची कमाल क्षमता प्रतिदिन ७ दशलक्ष बॅरलपर्यंत वाढवली. या कल्पक धोरणामुळे, होर्मुझ संकटानंतरही तेल निर्यात अखंडपणे सुरू राहिली. अरामकोने आपल्या अनोख्या डावपेचांनी संकटे असतानाही आपल्या नफ्यात वाढ केली . हे विशेष असल्याचे जाणकार सांगतात .
अरामकोचे सीईओ अमीन नासेर यांनी त्यांच्या या धोरणात्मक निर्णयाला अचूक आणि ठोस पर्याय असल्याचे सांगितले आहे . ते म्हणाले की, कंपनीच्या विविध मालमत्ता, प्रचंड साठवण क्षमता आणि पर्यायी पाइपलाइन नेटवर्कमुळे युद्धाच्या काळातही व्यापार सुरळीत चालू राहिला, तर दुसरीकडे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे शेजारील देशांना मोठे नुकसान झाले. हे सुद्धा त्यांनी नमूद केले आहे . या पाईपलाईनमुळे इतर तेल विक्री करणाऱ्या कंपन्यांपेक्षा अरामाको जास्त फायद्यात जात आहे . ईतर तेल कंपन्यांकडे हा पर्यायी मार्ग नसल्यामुळे ते तेलाच्या मार्केटमध्ये आपले स्थान टिकवू शकत नसल्याचे निदर्शनास आले आहे .
Israel-Gaza conflict : इस्रायलचा नकार ;अमेरिकेच्या पाठिंब्याच्या गाझा योजनेला सहमती नाही
सऊदी अरबने या युद्ध काळात जरी चांगले प्रदर्शन केले असले तरी अरामको या कंपनीने जागतिक बाजारासाठी एक इशारा दिला आहे . अनिश्तिच काळासाठी सुरु असलेले युद्ध जरी उद्या संपले आणि होर्मूझ पुन्हा सुरु झाले तरी , जागतिक तेलाची निर्यात पूर्ववत करण्यासाठी मोठा वेळ जाईल . त्यामुळे युद्ध थांबल्यानंतर लगेच स्थिती पहिल्यासारखी होणार नाही .






