संग्रहित फोटो
पुणे : मान्सुनचे पुण्यात आगमन झाले आहे. यासंदर्भात हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेने अधिकृत जाहीर केले आहे. साेमवारी सकाळी पावसाने उघडीप दिली हाेती, दुपारनंतर मात्र शहरांत पावसाची संततधार सुरु हाेती. गेल्या काही दिवसापासून पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाने जाेरदार हजेरी लावली आहे. हा पाऊस अवकाळी आहे की मान्सुनपुर्व हा प्रश्न पडला हाेता. दरम्यान, साेमवारी हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने पुण्यात मान्सुनचे आगमन झाल्याचे जाहीर केले आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मे महीन्यातच पुण्यात मान्सुन दाखल झाला आहे. गेल्यावर्षी दहा जुनला मान्सून दाखल झाला हाेता. मान्सुनची प्रगती याेग्य दिशेने हाेत असून, पुढील काळात राज्याच्या उर्वरीत भागही ताे व्यापेल, असा अंदाजही वेधशाळेने व्यक्त केला आहे.
दरम्यान, पुण्याला मंगळवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आकाश सामान्यत: ढगाळ राहून मध्यम ते जाेरदार स्वरुपाचा पाऊस पडेल, तर घाट विभागासाठी रेड अलर्ट दिला आहे. या भागात तुरळक ठिकाणी अत्यंत जाेरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बुधवार आणि गुरुवार या दाेन दिवसांत हलका ते मध्यम स्वरुपाचा तर शुक्रवारी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान , साेमवारी पुणे शहरात सर्वांत जास्त पावसाची नाेंद मगरपट्टा, हडपसर, काेरेगांव पार्क या भागात झाली. या भागांत अनुक्रमे २९. ६ आणि २९.४ आणि २९.१ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली. ग्रामीण भागांत आंबेगाव, तळेगाव ढमढेरे, राजगुरुनगर या भागांतही पावसाने चांगली हजेरी लावली.
हे सुद्धा वाचा : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, पिकांचेही मोठे नुकसान
शहरात सोमवारी झालेला पाऊस (मिमी)