वास्तूशांतीचा कार्यक्रम आटोपरून परतणाऱ्या कुटुंबाबर काळाचा घाला; भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू
नागपूर : यू-टर्न घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिल्यानंतर सिमेंट मिक्सर असलेला ट्रक उलटला. यात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशिरा वर्धा मार्गावर जामठा टी-पॉइंट परिसरात हा भीषण अपघात झाला. घटनेवेळी लगतच एका कारमध्ये 4 जण होते. ते अगदी थोडक्यात बचावले.
हेदेखील वाचा : शेतमालकाच्या मुलाची मजूराच्या मुलीवर पडली नजर; लैंगिक अत्याचार केला अन् मुलगी गरोदर राहताच…
रामलाल चौरान (वय 50, रा. राजस्थान) असे मृताचे नाव आहे. स्वप्नील हुलके (वय 33, रा. रा. दिवाण ले-आउट, मानेवाडा) असे या प्रकरणातील तक्रारदार प्रत्यक्षदर्शीचे नाव आहे. शनिवारी स्वप्नील आपल्या 3 मित्रासोबत वर्धा मार्गावरील रेस्टॉरंटमध्ये जेवाण्यासाठी गेले होते. जेवण आटोपून रात्री 3.30 वाजताच्या सुमारास सर्वजण स्वप्निलच्या कारमधून शहरात परत होते. जामठा टी-पॉईंटवरून स्वप्नीलला यू-टर्न घ्यायचा होता. त्याचवेळी (केए 41- डी 4415) कंटेनर ट्रकचा चालक रामलाल याला यू-टर्न घेऊन वर्ध्याकडे जायचे होते.
दोन्ही वाहने वाट शोधत वळणावर थांबली. त्याचवेळी (टीएस 22-टी 9423) सिमेंट मिक्सर ट्रक नागपूरच्या दिशेने येत होता. या ट्रकने कंटेनरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कंटेनरची केबिनच उखडली गेली. यानंतर मिक्सर ट्रक विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या स्वप्नीलच्या कारवर उलटला. योगायोगाने ट्रक कारच्या बोनेटवर उलटला. सुदैवाने कारमधील चारहीजण थोडक्यात बचावले. घटनेनंतर वर्धा मार्ग जाम झाला होता. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून गंभीर जखमी रामलाल आणि मिक्सर ट्रकच्या जखमी चालकाला उपचारासाठी एम्स रुग्णालयात पाठवून दिले. उपचारादरम्यान रामलालचा मृत्यू झाला.
अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवण्यात अडचण
अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवणे हे अत्यंत अवघड होते. 2 क्रेन लावूनही ट्रक हलत नव्हते. बऱ्याच प्रयत्नानंतर वाहने रस्त्यावरून हटवण्यात आली. पोलिसांनी मिक्सर ट्रकच्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, तो जखमी झाल्याने त्याची ओळख पटलेली नाही.
हेदेखील वाचा : लग्नाचे आमिष दाखवून बिल्डरने केला तरूणीवर लैंगिक अत्याचार; पुण्यातील धक्कादायक प्रकार