The Court Reprimanded The Police Swabhimani Leader Ravikant Tupkar Granted Bail Nrdm
कोर्टाने पोलिसांना पुन्हा फटकारले; ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकरांना जामीन मंजूर
रविकांत तुपकर यांना गुरूवारी सायंकाळी उशिरा राजूरी घाटातून पोलिसांनी अटक केली होती. या अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र आज बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर ठरवत तुपकरांना जामीन मंजूर केला आहे.
सोयाबीन व कापूस दरवाढीसाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गुरूवारी सायंकाळी उशिरा राजूरी घाटातून त्यांना पोलिसांनी अटक केली होती. या अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र आज बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर ठरवत तुपकरांना जामीन मंजूर केला आहे.
आम्ही थांबणार नाही….
न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तुपकर यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मला झालेली अटक ही बेकायदेशीर ठरवली आहे. सरकारने कितीही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची घोषणा करु” असेही ते म्हणाले आहेत.
Web Title: The court reprimanded the police swabhimani leader ravikant tupkar granted bail nrdm