कल्याण-अमजद खान : मनसे कल्याण शहर अध्यक्ष शीतल विखणकर यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे. आधी विखणकर या त्यांच्या कल्पेश अपार्टमेंट या राहत्या घरी जळाल्या होत्या अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती. मात्र आता धक्कादायक माहिती समोर आली आहे की भिवंडी कोणगाव येथील एका घरात त्या जळाल्या होत्या. या घटनेत त्यांच्या ड्रायव्हर अविनाथ पाटील त्या घरात होता. पोलीस तपासा दरम्यान ही घटना कोणगाव येथील घरी झाल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. सध्या हे प्रकरण भिवंडी कोनगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
घरगुती गॅसच्या गळतीमुळे लागलेल्या आगीत मनसे शहर अध्यक्षा शीतल विखणकर या गंभीर जखमी झाल्या होत्या. पंधरा तारखेला दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याचे बोलले जात होते. विखनकर यांना उपचारासाठी आधी भिवंडी येथील वेद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेथून त्यांना ऐरोली येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. या घटनेत विखणकर 80% भाजल्यानें त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर विखणकर यांची प्राणजोत मावळली. दरम्यान या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. ही घटना कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील कल्पेश अपार्टमेंट या विखणकर यांच्या राहता घरी झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती .
मात्र आता ही घटना भिवंडी कोनगाव हद्दीतील एका इमारतीमधील घरात घडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. ही घटना घडली तेव्हा त्यांचा ड्रायव्हर स्वीय सहाय्यक अविनाश पाटील हा त्या घरात होता. त्यानेच विखंकर यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान हे प्रकरण भिवंडी कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण आता कोनगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे खडकपाडा पोलिसांकडून सांगण्यात आले. या धक्कादायक खुलासामुळे नेमकी काय घटना घडली होती आणि ती कशी घडली होती याबाबत आता संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत शितल विखणकर गेल्या दहा वर्षापासून शहर अध्यक्ष या पदावर होत्या 15 वर्षापासून त्या राजकारणात सक्रिय होत्या.