संग्रहित फोटो
पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासह आठरा प्रभागातील नगराध्यक्ष पदाच्या प्रभागातील १८ असे एकूण १४३ उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये सिलबंद झाले आहे. एका प्रभाग मध्ये मतदाराच्या ओळखीमुळे बाचाबाची होऊन किरकोळ झटापट वगळता शहरात शांततेत मतदान पार पडले. शहरातील सर्वात मोठी मतदारांची संख्या असणाऱ्या शहरातील ९४ हजार ५५९ पैकी ६० हजार ८४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करण्यासाठी ९० वर्षाच्या वृद्धांसह लग्न मंडपातील नवरदेवांनी बुथ गाठुन मतदान केल्याने ६४.३४ टक्के मतदारांनी आपले उमेदवार निवडीसाठी उत्स्फुर्त प्रतिसाद देत लोकशाहीचा सण साजरा केला.
मतदार याद्यांच्या चुकीमुळे मतदारांची हेळसांड
पंढरपूर शहरात एकाच घरात राहणाऱ्या मतदारापैकी कांहीचे दुसऱ्या प्रभागातील मतदान यादीत नाव, याचबरोबर प्रभागातील मतदार संख्या जास्त असल्याने प्रभागात दोन वेगवेगळे बुथ व काही ठिकाणी तीन बुथ उपलब्ध करण्यात आले होते. प्रभागाच्या अंतीम मतदार यादीप्रमाणे उमेदवारांना देण्यात आलेल्या यादीत अनु क्र. १ पासुन शेवटपर्यंत अनुक्रमांक होता. परंतु प्रभागास दोन बुथमध्ये मतदाराचे विभाजन करून पहिल्या बुथमध्ये अर्धे व दुसऱ्यामध्ये अर्धे मतदान घेताना अनुक्रमांक १ पासुन सुरुवात करण्यात आल्याने यावेळी उमेदवारांना मतदारांचा अनुक्रमांक देण्यासाठी मोठा गोंधळ उडत असल्याचे दिसून आले. यामुळे मतदाराला आपले नाव बुथ क्र १ मध्ये आहे का बुथ क्र २ मध्ये आहे. यासाठी वेळ वाया घालवण्यात मतदारांची हेळसांड झाली.
माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सहपरिवार मतदान केले. पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. निकालाची तारीख झालेल्या एकुण आकडेमोडी करत लांबल्याने मतदानापैकी आपल्या विजयासाठी लागणाऱ्या मतांचा मेळ बसतो का, यामध्ये उमेदवार व्यस्त झाले आहेत.






