The Government Should Give Clarity On Exactly How To Provide Maratha Reservation Sambhaji Raje Chhatrapatis Demand Nrdm
मराठा आरक्षण नेमके कसे देणार याची स्पष्टता सरकारने द्यावी; संभाजीराजे छत्रपती यांची मागणी
नव्या वर्षाच्या सुरुवातीला मराठा समाजाच्या संघर्षाला यश यावे अशी भावना व्यक्त करत मराठा समाजाला आरक्षण नेमके कसे देणार याची स्पष्टता सरकारने द्यावी, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे.
कोल्हापूर : नव्या वर्षाच्या सुरुवातीला मराठा समाजाच्या संघर्षाला यश यावे अशी भावना व्यक्त करत मराठा समाजाला आरक्षण नेमके कसे देणार याची स्पष्टता सरकारने द्यावी, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर चालढकल करणे परवडणार नाही, असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. २०२३ हे वर्ष संघर्षाचे होते. आरक्षणासाठी अनेक मराठा तरूणांनी आत्महत्या केल्या. मात्र अजूनही राज्यकर्ते समाजाची दिशाभूल करत आहेत का, असा प्रश्न पडतो. सरकार म्हणते कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता टिकणारे आरक्षण देणार. कुणाला धक्का न लावता देणार याचा अर्थ ५० टक्केवर देणार ? पण यापूर्वी दोनदा असे आरक्षण टिकलेले नाही, मग नेमके आरक्षण देणार कसे ? टिकणारे आरक्षण म्हणजे नेमके काय ? हे सरकारने स्पष्ट करावे.
चालढकल करणे परवडणार नाही
किमान येत्या वर्षाच्या सुरूवातीला तरी आपल्या संघर्षाला यश मिळेल अशी अपेक्षा मराठा समाज बाळगून आहेत. त्यामुळे केवळ तारखांवर तारखा देऊन चालढकल करणे आता कुणालाही परवडणार नाही, अशी पोस्ट संभाजीराजे यांनी केली आहे.
Web Title: The government should give clarity on exactly how to provide maratha reservation sambhaji raje chhatrapatis demand nrdm