सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे राजधानी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, चार महिन्यांमध्ये राज्यभरातील तब्बल दोन लाख शिवप्रेमींनी संग्रालयास भेट दिली आहे. तसेच या शिवप्रेमींनी ऐतिहासिक वाघनखांसह शिवकालीन शस्त्र व अन्य वस्तूंचा इतिहासही जाणून घेतला आहे. लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेल्या वाघनखांना ऐतिहासिक महत्त्व आहे.
लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधील ऐतिहासिक वाघनखे पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहेत. राज्य शासनाने लंडन येथील म्युझियमशी तीन वर्षांचा करार केला असून, वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात राहणार आहे. ही वाघनखे भारतात दाखल झाल्यानंतर ती सर्वप्रथम स्वराज्याच्या राजधानीचा मान मिळालेल्या साताऱ्यात आणण्यात आली. दिनांक १९ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करून शिवप्रेमींसाठी खुले झाले.
३१ जानेवारी २०२५ पर्यंत राहणार वाघनखे
संग्रहालयात वाघनखांसह साताऱ्याचे तख्त, स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा, भाले, तलावारी, कट्यार, चिलखत, बंदुका, चांदी व सोन्याच्या मुद्रा आदी वस्तू पाहण्यासाठी मांडण्यात आल्या आहेत. शस्त्र प्रदर्शन सुरू झाल्यापासून शालेय विद्यार्थ्यांसह राज्यभरातील नागरिक तसेच शिवप्रेमी संग्रहालयाला भेटी देत आहेत. गेल्या चार महिन्यांत सुमारे दोन लाख नागरिकांनी संग्रहालयास भेट दिली असून, येथील वाघनखे व शस्त्रास्त्रांचा इतिहास जाणून घेतला. चार महिन्यांपूर्वी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखे दाखल झाली. या वाघनखांचे व संग्रालयातील प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत थाटात उदघाटन देखील झाले. त्यानंतर हि वाघनखे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली. मात्र, ऐतिहासिक अशी हि वाघनखे ३१ जानेवारी २०२५ पर्यंतच नागरिकांना येथे पाहता येणार आहे. यानंतर वाघनखे नागपूर येथील संग्रहालयात पाठविली जाणार आहेत.
वाघनखे काय आहे?
साताऱ्यातील मार्केट यार्ड येथे १९७० रोजी या संग्रहालयाचे काम पूर्णत्वास आले; परंतु वस्तू संग्रहालयासाठी ही जागा अपुरी पडू लागल्याने बसस्थानकाशेजारी असलेल्या हजेरी माळावर संग्रहालयाची नूतन इमारत उभी राहिली. या वाघनखांबद्दल आतापर्यंत एकात आलो आहोत त्या वाघनखांबद्दल सांगायचे झाले तर वाघनखे हे मजबूत धातूपासून बनवलेले शस्त्र आहे, ज्यात वाघाच्या पंजाच्या नखांप्रमाणे धारदार दांडके जोडलेले असतात. ती व्यक्तीच्या हाताच्या मुठीत बसते. याच्या दोन्ही बाजूंना अंगठी असते जी हाताच्या पहिल्या आणि चौथ्या बोटात घातली जाते. यामुळे ते हातात बसते.