पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील (Ganeshkhind Road Traffic) वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर तीन पर्यायी वर्तुळाकर पर्यायी मार्ग (Optional Rout) उपलब्ध करुन देण्यात आले आहे. विद्यापीठ चौकातून (University Chowk) ओैंधकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक (आचार्य आनंदऋषीजी चौक), बाणेर रस्ता, गणेशखिंड रस्ता, पाषाण रस्ता, सेनापती बापट रस्ता तसेच अन्य मार्गांवर वाहतूक बदल प्रस्तावित आहेत. वाहतूक पोलीस, महापालिका, मेट्रो, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) या संस्थेतील अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली.
बाणेर रस्ता, ओैंध रस्त्याने विद्यापीठ चाकात येणारी वाहने विनासिग्नल शिवाजीनगरकडे डाव्या मार्गिकेने सोडण्यात येणार आहे. विद्यापीठ चौकात पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. गणेशखिंड रस्त्याने सेनापती बापट रस्त्याकडे जाण्यासाठी यापूर्वी कॉसमॉस बँक येथे वळण्याची परवानगी (यू टर्न) दिली होती.
नवीन वाहतूक बदलानुसार कॉसमॉस बँकेजवळील वळण बंद करुन सेनापती बापट रस्ता चौकातून उजवीकडे वळण्यास परवानगी देण्यात येणार आहे. सेनापती बापट रस्त्याने विद्यापीठ चौकाकडे येणारी वाहतूक सेनापती बापट रस्ता चौकातून डावीकडे वळवून पाषाण रस्त्याकडे वळविण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
गणेशखिंड रस्त्याने विद्यापीठ चौकाकडे जाण्यासाठी प्रस्तावित असलेले तीन वर्तुळाकार मार्ग पुढीलप्रमाणे –
वर्तुळाकार मार्ग – गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता, विद्यापीठ, चतु:शृंगी पोलीस ठाणे, केंद्रीय विद्यालय, पाषाण रस्ता, सिंहगड गेट (पुणे ग्रामीण मुख्यालय) येथून उजवीकडे वळून बाणेर रस्त्याने ओैंध किंवा उजवीकडे वळून विद्यापीठ चौकातून वळून पुन्हा ओैंध.
वर्तुळाकार मार्ग – पाषाण रस्ता, अभिमानश्री सोसायटी, बाणेर रस्ता चौकातून ओैंध किंवा उजवीकडे वळून विद्यापीठ चौकातून ओैंध.वर्तुळाकार मार्ग तीन- गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता, पाषाण रस्ता, अभिमानश्री सोसायटी, बाणेर रस्ता चौकमार्गे उजवीकडे वळून सर्जा हॉटेल चौकमार्गे ओैंध
पिंपरी-चिंचवड शहराकडून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी मार्ग– ब्रेमेन चौक, स्पायसर कॉलेज रस्ता, डॉ. आंबेडकर चौक, साई चौक, खडकी रेल्वे स्थानक, भुयारी मार्ग, चर्च चौक, जुना मुंबई-पुणे रस्ता.
पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क भागातून ओैधकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा- अभियांत्रिकी महाविद्यालय उड्डाणपूल, वाकडेवाडी, पोल्ट्री फार्म चौक, चर्च चौक, खडकी पोलीस ठाणे, जे टाईप फुटबॉल मैदान, साई चौक, डॉ. आंबेडकर चौक, स्पायसर कॉलेज रस्ता, ब्रेमेन चौकमार्गे ओैंध