मुंबई : मुंबईत गुरूवारी मध्यरात्री औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांचा मेळावा पार पडला. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. पक्षाचा मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांना (Shivsainik) काही मिळाले नाही. शिवसैनिकांचे एकही काम झाले नाही. दुसऱ्या पक्षाची कामे झाले, तिसऱ्याचा पक्ष वाढला, आम्ही गेलो चार नंबरवर अशी टिका केली.
शिवसेनेला वाचविण्यासाठी हा उठाव केला आहे. पक्षांचे खच्चीकरण करण्याची सुपारी कुणी घेतली आहे, असे म्हणत संजय राऊतांवर (Sanjay Raut) तोफ डागली. तर आमचा शिवसैनिकांचे कामे झाली नाहीत; मात्र त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत त्यांना संपविण्याचे प्रयत्न सुरू होते. यासाठी आम्ही उठाव केल्याचे एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले.
आमदार संजय शिरसाट यांचा मुंबईत मध्यरात्री मेळावा (Midnight Rally) आहे, असे वाटत नाही. सर्वांच्या चेहऱ्यावर तेज आहे, असे म्हणत असा मेळावा कधी झाला नाही. ही ऐतिहासिक घटना आहे आणि आम्ही केलेल्या घडामोडीही ऐतिहासिक आहेत. त्यांची ३३ देशांनी दखल घेतली असून केवळ एकनाथ शिंदे आणि ५० आमदार हेच टिव्हीवर दाखवले जात होते. मात्र, संख्या गुवाहटीमधून वाढवायला नको मुंबईत जात संख्या वाढवू असे ठरवले आणि मुंबईत आलो असे मुख्यमंत्री म्हणाले.
राष्ट्रवादीकडून शिवसेना संपवण्याचे काम
सोबत राष्ट्रवादीने शिवसेना उमेदवार संपवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. जिथे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या उमेदवारांची घोषणा होत होती. त्यांच्या पराभूत उमेदवारांना बळ देण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू होते. आमदारांना मतदारांना तोड द्यायचे असते, त्यासाठी निधी देणार कसा, असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.