मुंबई : मागील आठवड्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर दोन दिवसीय विशेष अधिवेशन (Special Adhiveshan) बोलावण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या (Speaker of the Assembly) निवडीनंतर सोमवारी शिंदे-फडणवीस (Shinde-fadnvis government) सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाले आहे. शिवसेनेच्या 39 आमदारांनी बंड केले आहे. शिंदे बंडखोर गट व भाजपाने राज्यात आता सरकार स्थापन केले आहे. त्यामुळं शिवसेना (Shivsena) व्हिपच्या विरोधात आज कोर्टात (vhip court) गेली आहे. तसेच शिवसेनेकडून आता पदाधिकारी यांच्या बैठकाचं सत्र सुरु आहे. आज आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) शिवसेना भवन (shivsena bhavan) येथे पदाधिकारी यांची बैठक (Meeting) घेतली.
दरम्यान, मी शिवसैनिकांचा आवाज ऐकतोय आणि शिवसैनिकांचे आवाज आम्हाला प्रत्येक ठिकाणी आधी पण येत होते, आणि आता पण येत आहेत. प्रत्येक शिवसैनिकांचा आवाज उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. गेल्या दोन अडीच वर्षात जे काय चांगलं काम झालं, ते लोकांसमोर आहे. आम्ही काही बोललो नाही, आपली काम लोकांसमोर आहेत. मला वाटतं बंडखोर आमदारांनी स्वतः आरशात बघून बोलायला हवे. मला वाटतं कोणाच्या खास प्रेमाची मला गरज नाही, आमचा अधिकृत व्हिप आहे. न्यायप्रविष्ठ गोष्टी असतील तर आमचा व्हिप महत्त्वाचा ठरणार. शिवसैनिकांसोबत जे एकनिष्ठ आमदार राहिलेले आहेत आम्ही त्यांच्यासोबत राहू.
मध्यावधी निवडणुका
आम्ही कॉन्फिडंट आहोत. जे पळून गेलेत ते जर निवडणुकीमध्ये मिळाले आणि मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार आहोत. आणि ही शक्यता आहे मध्यावधी निवडणुका महाराष्ट्रात लागतील. सगळे विश्लेषण आहे हे लोकांनी स्वतः केलेले आहे. त्यावर आम्ही बोलण्याची गरज नाही. पण जर काय मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार आहोत असं आदित्य ठाकरे म्हणाले.