पाचगणी : शहर व परिसरात घरफोडी व चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक करण्यात पाचगणीच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले असून चारही आरोपींकडून पोलिसांनी २ लाख ४४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, वाई उपविभागिय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम यांनी दिलेल्या सूचनेनुसार, पाचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व तपासी पोलीस अंमलदार विनोद पवार व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार तानाजी शिंदे व पोलीस काॅन्टेबल उमेश लोखंडे यांनी घडणाऱ्या गुन्ह्याबाबत गोपनीय खबऱ्यामार्फत माहीती मिळवून मिळविली.
या माहितीच्या आधारे यातील संशयित आरोपी ओंकार संतोष राजपुरे, विशाल सुरेश आडागळे, सागर निलेश वैराट, दिपक नथुराम गोळे या चौघांच्या पाचगणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पाचवा संशयित आरोपी रुपी वाडकर हा फरार झाला आहे.
गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, वाई उपविभागिय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, तपासी पोलीस अंमलदार पवार यांनी आरोपींकडे चौकशी करुन चोरीस गेलेला माल हस्तगत केला.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, विनोद पवार, पोलीस नाईक तानाजी शिंदे व पोलीस काॅन्स्टेबल उमेश लोखंडे यांनी कारवाईत भाग घेतला.