Top Marathi News today Live
Marathi Breaking news live updates : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. ते अजित पवार यांच्या गटात येणार असल्याचे म्हटले जाते. परंतु या चर्चांना जयंत पाटील यांनी अफवा असल्याचे म्हटले आहे. मात्र, राजकीय गटात याबाबत चर्चा थांबत नाही. आता शनिवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक पुण्यात होत आहे.
22 Mar 2025 05:33 PM (IST)
युवक काँग्रेसलाही गटबाजीचे ग्रहण लागले आहे. प्रदेश शाखेच्या नव्याने करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या अखिल भारतीय युवक काँग्रेसने अवघ्या ८ तासांमध्ये रद्द केल्या आहेत. त्याबरोबरच ज्यांनी कोणी या नियुक्त्या केल्या त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत व अखिल भारतीय युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यातील मतभेद यातून उघड झाले आहे. प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आता कोणामागे रहायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
22 Mar 2025 05:18 PM (IST)
एप्रिल २०२४ चे निर्णयानुसार माथेरान शहरात इ रिक्षा एकूण २० असणार आहेत. .मात्र सर्वोच्य न्यायालयाने फटकारल्यानंतर प्रथमच प्रांत अधिकारी यांच्या सहीने माथेरान पालिकेची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
22 Mar 2025 05:14 PM (IST)
भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) प्रत्येक वर्गासाठी योजना देते. त्याचप्रमाणे, लोकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणारी पेन्शन लाभ देण्याची योजना देखील सुरू केली आहे. ही योजना प्रत्येक वर्गासाठी आहे, जी आजीवन पेन्शनचा लाभ देते. ही एकच प्रीमियम योजना आहे, म्हणजेच पैसे एकदाच जमा करावे लागतात. एलआयसीच्या स्मार्ट पेन्शन योजनेअंतर्गत खाते एकटे किंवा संयुक्तपणे उघडता येते. संयुक्त भागीदारीमध्ये एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर, दुसऱ्या व्यक्तीला आयुष्यभर पेन्शन लाभ मिळत राहतील. या योजनेत निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ मिळतो. याशिवाय, तात्काळ पेन्शनचीही तरतूद आहे.
22 Mar 2025 04:41 PM (IST)
दुसऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी शानदार कामगिरी करीत बॅडमिंटनमध्ये दोन पदके निश्चित केली. अंतिम फेरीत धडक दिलेल्या आरती पाटील आणि सुकांत कदमकडून आता सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.
22 Mar 2025 04:22 PM (IST)
कोरटकरला पाठीशी घालणारे लोकही साधीसुधी नसावी असे दिसतंय. कोरटकरला काही राजकीय विचारधारेचा सपोर्ट असल्यासारखे दिसून येतंय असे वकील असिम सरोदे यांनी म्हटले आहे.
22 Mar 2025 04:01 PM (IST)
वक्फचा कायदा जगात कुठेही नाही, हा कायदा फक्त भारतात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार या कायद्यासंदर्भात नवीन बील आणत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंदू समाजाच्या जमिनी घेतलेल्या आहेत, ज्या कब्जा केलेल्या आहेत, त्यासाठी न्याय मागण्याचा अधिकार सुद्धा नसतो. तो सगळा अधिकार हिंदू समाजाला परत देण्याचं काम आमचं सरकार करेल, असे भाजप मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे.
22 Mar 2025 04:00 PM (IST)
दिशा सालियन मृत्यूप्रकरणात शिवसेनेचे (ठाकरे गट) युवा नेते आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला, असा उल्लेख याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव जोडलं जात होतं. त्यांची चौकशी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान या प्रकरणावर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
22 Mar 2025 02:38 PM (IST)
पंतप्रधानांचा नागपूर दौरा पूर्वी ठरल्याप्रमाणे होईल. या दंगलीचा पंतप्रधान मोदींच्या भेटीवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांनी सांगितले की, ही दंगल फक्त नागपूरच्या काही भागांपुरती मर्यादित होती आणि उर्वरित नागपूरमध्ये या दंगलीचा कोणताही परिणाम झाला नाही. पंतप्रधान मोदी ३० मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर असतील.
22 Mar 2025 02:36 PM (IST)
दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांना सत्ताधाऱ्यांनी घेरलं आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्या प्रकरणांमध्ये मी बातम्या वाचत आहे. बातम्या देत असताना वस्तुस्थितीला धरून बोललं पाहिजे. तुम्ही पण वस्तुस्थितीला धरूनच बातमी दिली पाहिजे. हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलं आहे. तिचे वडील न्यायालयामध्ये गेले आहेत, न्यायालय काय तो निर्णय देईल, असे अजित पवार यांनी म्हटले.
22 Mar 2025 02:05 PM (IST)
नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई दंगेखोरांकडून वसूल केली जाणार आहे. 1992 नंतर नागपूरमध्ये दंगलीसारखी कोणतीही मोठी घटना घडली नाही. त्यामुळे आता या दंगेखोरांना आता सरळ केलं नाही तर त्यांना सवय पडेल. त्यामुळे दंगेखोरांवर कारवाई करताना पोलिसांकडून कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
22 Mar 2025 01:33 PM (IST)
दुबईला पळल्याचा संशय असेलाला प्रशांत कोरटकर विरोधात लुकाउट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशन कडून कोरटकर याने कुठे कुठे प्रवास केला याची माहिती घेतली जात आहे.
22 Mar 2025 01:30 PM (IST)
एअर इंडियाच्या विमान उड्डाणाच्या विलंब झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे यांनी विमान उड्डाणाच्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आणि व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विमान कंपनीची जबाबदारी घेण्याची मागणी केली आहे. सुप्रिया म्हणाल्या की, हे सतत चालणाऱ्या ट्रेंडचा एक भाग बनले आहे आणि ते अस्वीकार्य आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी X वरू पोस्ट केली आहे .
22 Mar 2025 01:13 PM (IST)
“महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्री मिळावा. महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री नाही. महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का?” काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
22 Mar 2025 01:11 PM (IST)
राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले आहे. याच मुद्द्यावरून नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यभरात औरंगजेबाची कबर हटवावी यासाठी आंदोलने केली जात आहे. मात्र आता हा मुद्दा मुंबई हायकोर्टात जाऊन पोहोचला आहे. औरंगजेबाची कबर हटवावी यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्त्याने ही याचिका दाखल केली आहे.
22 Mar 2025 12:43 PM (IST)
हडपसर पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या वडाच्या झाडावरून माथेफिरू तरुणाने उडी मारली आहे. मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेला 24 वर्षे तरुण आज पहाटे झाडावर चढला होता. मुख्यमंत्र्याची भेट व्हावी अशी मागणी त्याने केली होती. नागरिकांना तरुणाला खाली उतरण्यास विनंती केली असता त्याने झाडावर उडी मारली.
22 Mar 2025 12:32 PM (IST)
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा ताबा सुटला. गाडी संरक्षक कठड्याला आदळल्याने एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
22 Mar 2025 12:25 PM (IST)
तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीचे लचके काढण्याचे काम रेती उत्पादक यांच्याकडून सुरु आहे. सध्या कर्जत तालुक्यात जागोजागी रेती माफिया यांच्याकडून उल्हास तसेच पोश्री नदीमध्ये देखील उत्खनन सुरु आहे. शासनाने रेती उत्खनन करण्यासाठी स्वामित्व शुल्क बंद केले आहे आणि त्यामुळे रेती उत्खनन अनधिकृतपणे केलं जात असून महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसत आहे.
22 Mar 2025 12:24 PM (IST)
मुंबईतील रुग्णालयांमध्ये सध्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. MRI, सीटीस्कॅनसाठी करावं लागतंय 15 दिवस ते 1 महिना वेटिंग करावी लागत आहे.
22 Mar 2025 12:02 PM (IST)
भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम) १ एप्रिल २०२५ पासून त्यांच्या एसयूव्ही आणि सीव्ही श्रेणीच्या किमती वाढवणार आहे. कंपनीने शुक्रवारी (२१ मार्च) ३% पर्यंत किंमत वाढ जाहीर केली आहे. त्यानुसार 1 एप्रिलपासून 8 कार कंपन्यांच्या किमती वाढणार आहेत. मारुती, ह्युंदाई आणि टाटा मोटर्स, कियासह 8 ऑटो कंपन्यांनी किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.
22 Mar 2025 12:00 PM (IST)
भारतातील टेक कंपनी Itel ने त्यांचे नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहे. हे नवीन स्मार्टवॉच Itel Unicorn Max या नावाने लाँच करण्यात आलं आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टवॉचमध्ये 1.43-इंचाची सर्कुलर AMOLED स्क्रीन आहे, जी 1,000 निट्स पीक ब्राइटनेस आणि Always-On Display सपोर्टसह येते. itel Unicorn Max ची किंमत 1,999 रुपये आहे, याची पुष्टी कंपनीने एका प्रेस रिलीजमध्ये केली. हे स्मार्ट वेअरेबल अॅल्युमिनियम सिल्व्हर, कॉपर गोल्ड आणि मेटिओराइट फिनिशमध्ये उपलब्ध आहे.
22 Mar 2025 11:53 AM (IST)
महिला सन्मान योजनेअंतर्गत पैसे न मिळाल्याबद्दल आम आदमी पक्ष दिल्लीत रेखा गुप्ता सरकारविरुद्ध निषेध करत आहे. गोविंदपुरी मेट्रो स्टेशनवरील निषेधात आतिशी देखील उपस्थित आहे.
22 Mar 2025 11:40 AM (IST)
हिंसाचाराच्या घटनेनंतर नागपूर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लागू करण्यात आलेली संचारबंदी सलग पाचव्या दिवशीही कायम आहे. ही संचारबंदी शहरातील 9 विभागात करण्यात आली असून दोन विभागातील संचारबंदी हटवण्यात आली आहे.
22 Mar 2025 11:30 AM (IST)
दिल्ली अग्निशमन दलाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले की, न्या. यशवंत वर्मा यांच्या घरी आग विझविताना अग्निशमन दलाच्या पथकाला कोणतीही रोख रक्कम मिळाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गर्ग यांच्या म्हणण्यानुसार, १४ मार्च रोजी रात्री ११.३५ वाजता ल्युटियन्स दिल्लीतील न्यायाधीशांच्या बंगल्याला आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहचले, तेथे स्टोअर रुमला आग लागली होती, ती विझवायला १५ मिनिटे लागली. त्यानंतर आम्ही पोलिसांना याबाबतची माहिती दिली. तेव्हा आम्हाला कोणतीही रोख रक्कम मिळाली नाही, अशी माहिती देण्यात आली.
22 Mar 2025 11:03 AM (IST)
शरद पवार अजित पवार यांच्यात वसंतदादा शुगर इंट्युटट मध्ये बैठक होणार आहे. यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. यावेळी त्यांनी, त्यांच्याकडे भेटीसाठी विद्याप्रतिष्ठान, रयत शिक्षण संस्था आणि वसंतदादा इंस्ट्युट आहे. आमच्याकडे अशा संस्था नाहीत. राजकारणात संवाद ठेवला पाहिजे या दांभिक गोष्टीवर आमचा विश्वास नाही, असे म्हटलं आहे.
22 Mar 2025 11:03 AM (IST)
आयपीएल २०२५ च्या समालोचकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. हे घडल्यानंतर, प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की तो समालोचन पॅनेलचा भाग का नाही. या सर्व बातम्यांमध्ये किती तथ्य आहे हे येणारा काळच सांगेल. पण दरम्यान, पठाणने आता स्वतःचे यूट्यूब चॅनेल उघडले आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर त्याच्या नवीन चॅनल ‘सिद्धी बात’ च्या लाँचची घोषणा केली आणि चाहत्यांना त्याला प्रेम आणि पाठिंबा देण्याचे आवाहन केले. यूट्यूब चॅनल उघडल्यानंतर, तो लवकरच या मुद्द्यावर आपली बाजू मांडेल अशी अपेक्षा आहे, जेणेकरून चाहत्यांना सत्य कळेल.
Mic on, filter off. #SeedhiBaat with #IrfanPathan – jahan baatein hoti hain asli.
Link yahi hai boss: https://t.co/NQixk8f3aN pic.twitter.com/xiOg3Ymyuv— Irfan Pathan (@IrfanPathan) March 22, 2025
22 Mar 2025 11:02 AM (IST)
नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार एमडीपी पक्षाचा शहराध्यक्ष फाईम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, एमडीपी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शेहजाद खान यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
22 Mar 2025 11:02 AM (IST)
स्मार्टफोन कंपनी Vivo च्या Vivo V50 Lite स्मार्टफोनचा 4G व्हेरिअंट अलीकडेच तुर्कीमध्ये लाँच करण्यात आला आहे. या 4G व्हेरिअंटनंतर आता कंपनीने या स्मार्टफोनचा 5G व्हेरिअंट लाँच केला आहे. V50 Lite चा 5G व्हेरिअंट MediaTek Dimensity 6300 चिपसेट, 6500mAh बॅटरी आणि 50-मेगापिक्सेल ड्युअल रियर कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. Vivo V50 Lite 5G स्मार्टफोन 399 युरो म्हणजेच सुमारे 37,200 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हा फोन 12GB रॅम + 512GB स्टोरेज पर्यायासह सादर करण्यात आला आहे. हा फोन सध्या स्पेनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
22 Mar 2025 11:01 AM (IST)
मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरील घोटाळे आणि फसव्या कारवाया रोखण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपवरील सुमारे 1 करोड अकाऊंट बॅन करण्यात आली आहेत. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अहवालात, मेटाच्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने 1 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान भारतात 99 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे. अहवालात असे म्हटले आहे की सर्व बंदी घातलेल्या खात्यांपैकी 13.27 लाख अकाऊंट्सवर अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच सक्रियपणे बंदी घालण्यात आली होती.
22 Mar 2025 11:00 AM (IST)
मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेच्या नोटीसा आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षांचे अनेक बडे राजकीय नेते गोत्यामध्ये आले आहेत.
22 Mar 2025 11:00 AM (IST)
नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर आज सहाव्या दिवशी शहरातील नऊ पोलिस स्टेशन परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारी रात्री झालेल्या दंगलीनंतर नागपूर शहरातील ११ पोलिस स्टेशन परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली. नागपूर पोलिस आयुक्तांनी गुरुवारी एका आदेशाद्वारे यापैकी दोन पोलिस स्टेशन क्षेत्रातील संचारबंदी उठवली. तथापि, आज सहाव्या दिवशीही उर्वरित नऊ पोलिस स्टेशन परिसरात संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. गणेशपेठ, कोतवाली, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा आणि यशोधरानगर पोलिस स्टेशन परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
22 Mar 2025 10:59 AM (IST)
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकाच केबिनमध्ये एकत्र चर्चा केली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये बंद केबिनमध्ये दोघांमध्ये चर्चा झाल्यामुळे आता दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.