ट्रॅक्टर ट्रॉलीची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू (संग्रहित फोटो)
शिरोली : ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक बसून अपघात झाला. या अपघातात पुलाची शिरोलीतील अनंत उर्फ बंटी नामदेव दरेकर (वय ४०) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप येथे घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बंटी दरेकर हा टोप येथे बहिणीकडे गेला होता. सायंकाळी तो टोप येथील बाजार कट्ट्या समोर शिरोलीला येण्यासाठी महामार्गालगत थांबला होता. दरम्यान, वाठारकडून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीची त्याला धडक बसली. या धडकेत ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर ट्रॉलीसह येथून पळ काढला.
हेदेखील वाचा : Bangalore Crime: अभिनेत्रीने एका अकाउंटवरून केल ब्लॉक, तरी दुसऱ्या अकाऊंट वरून पाठवला अश्लील वीडियो! बंगळूरुतील घटना
दरम्यान, या घटनेची माहिती शिरोलो एमआयडीसी पोलिसांना समजतात त्यांनी घटनास्थळी जाऊन दरेकर याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. दरेकर यांच्या पश्चात आई, पत्नी व तीन लहान मुले आहेत.
उत्तर प्रदेशात भीषण अपघात
उत्तर प्रदेशात भीषण अपघात झाला. बाराबंकी येथील देवा फतेहपूर रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक आणि कारच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान दोघांचा ट्रॉमा सेंटरमध्ये मृत्यू झाला. कारमधील सर्व आठ जणांचा मृत्यू झाला आहे. लखनौमध्ये दोन मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. तर उर्वरित सहा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठण्यात आले आहेत.
हेदेखील वाचा : पेट घेताच आगीचा गोळा बनली कार, 1 किलोमीटरपर्यंत जळती कार चालवत राहिला ड्रायव्हर… घटनेचा थरारक Video Viral






