नागपुरात दोन गटात राडा, तुफान दगडफेक,परिसरात तणावाचं वातावरण
नागपूरमध्ये दोन गटात हाणामारी झाल्यानंतर तुफान राडा झाला आहे. त्यानंतर दगडफेकीची घटना घडली आहे. या घटनेमुळे सध्या नागपुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे शिवाजी चौकाला छावणीचं स्वरूप आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट शिवाजी चौकाच्या जवळ पोहोचला होता. या गटाना घोषणाबाजीला सुरुवात केली. दुपारी झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनासंदर्भात त्यांचा रोष होता. घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळे केलं. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना शिवाजी चौकावरून चिटणीस पार्कच्या दिशेने मागे ढकलले.
#WATCH | Nagpur (Maharashtra) violence: DCP Nagpur Archit Chandak says, “This incident occurred due to some miscommunication. Situation is under control right now. Our force here is strong. I appeal to everyone to not step out…or pelt stones. Stone pelting was taking place, so… pic.twitter.com/PJ8mfzQmGD
— ANI (@ANI) March 17, 2025
मात्र चिटणीस पार्कच्या पलीकडे भालदारपुरा परिसरातून मोठ्या प्रमाणावर पोलिसांवर दगडफेक सुरु झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या आकाराचे दगड पोलिसांच्या दिशेने भिरकावले जात असल्यामुळे पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या वापरून जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. दगडफेकीमध्ये काही गाड्यांचे नुकसानही झाल्याची माहिती आहे.
दोन गटात वाद झाल्यानंतर काहींनी वाहनांची जाळपोळ केली. महल परिसरातील दोन वाहने जाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जेसीबी आणि एक लहान वाहन अशी दोन वाहने जाळण्यात आली आहे. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर परिसरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेत पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
#WATCH | Nagpur (Maharashtra) violence | A Police personnel present at the spot in Mahal area, injured.
Tensions have broken out here following a dispute between two groups. pic.twitter.com/UAGJVuqAU7
— ANI (@ANI) March 17, 2025
नागपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आम्ही सतत पोलिस प्रशासनाच्या संपर्कात आहोत. नागरिकांनी सहकार्य करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सक्रियपणे कार्यरत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.