तुमचे प्रमुख मोदींची माफी मागण्यासाठी गुपचूप दिल्लीत गेले; औरंगजेबावरून एकनाथ शिंदे विधानसभेत आक्रमक
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात तणावाचं वातावरण असून त्याचे पडसाद आज अधिवेशनातही उमटले. दरम्यान विरोधकांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधान परिषदेत चांगलेच आक्रमक झाले होते. शिवाजी महाराजांचे विचार सोडून औरंगजेबाची विचारसणी असणाऱ्या कॉंग्रेस सोबत गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागण्यासाठी यांचे प्रमुख दिल्लीला गेले होते, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नावं न घेता लगावला.
Nagpur Violence : राज्यात अशांतता निर्माण करु नका…; दंगलीनंतर छगन भुजबळ यांचे सर्व पक्षांना आवाहन
औरंगजेबाच्या कबर हवण्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. काही संघटनांकडून कबर हटवण्याची मागणी जोर धरत आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनीही आम्हाला नाविलाजाने कबरीला संरक्षण द्यावं लागत आहे, मात्र त्याचं महिमामंडण होऊ देणार नाही, असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याच्या काही तासातंच नागपूरमध्ये दोन गटात राडा झाला. तुफान दगडफेक झाली. जाळपोळ करण्यात आली. यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर नागपुरात छावणीचं स्वरूप आलं आहे. त्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले.
एकनाथ शिंदे यांनी औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून विरोधकांना चांगलंच फटकारलं. तसंच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. अबू आझमींनी औरंगजेबाला कुशल प्रशासक म्हटलं, असं बोलताना लाज कशी वाटली नाही. औरंगजेबासारख्या आक्रमकांनी पूर्वीच्या खूणा पुसून टाकण्यात आल्या. संभाजी महाराजांच्यावर अतोनात हाल करू त्यांची हत्या करण्यात आली. अशा औरंगजेबाची तुलना कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत केली. त्यांचे संभाजी महाराजांसाराखे हाल झाले का? असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.
एकनाथ शिंदेंच्या विधानावर ठाकरे गटाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. त्याला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले. खुर्चीसाठी तुम्ही शिवाजी महाराजांचे विचार सोडून औरंगजेबाची विचारसरणी असणाऱ्या कॉंग्रेस सोबत गेला. बाळासोहेबांचे विचार सोडले आणि औरंगजेबाचे विचार धरून खुर्ची मिळवी. २०१९ मध्ये सत्ता मिळवली. त्यामुळे तुम्हाला बोलण्याचा अधिकार काय?
हे आणि यांचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागण्यासाठी दिल्लीला गेले होते. मात्र इकडे येऊन पलटी मारली. आशिष शेलार, प्रविण दरेकरांना जेलमध्ये टाकणार होते. मात्र मी यांचा टांगा पलटी केला आणि भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन केली. मी शिवसेना वाचवली. बाळासाहेबांचे विचार राखले. त्यामुळे जनतेने यांची जागा दाखवली. यांनी १०० जागा लढवली आणि फक्त २० निवडून आल्या. आम्ही ८० लढवल्या आणि ६० जिंकून दाखवल्या, असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला.