अखेर उद्धव ठाकरेंनी घातली भाजपला साद; ऐन निवडणुकीत मतभेद बाजूला ठेवून एकत्र?
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून उद्धठ ठाकरे भाजपसोबत पुन्हा जाणार का? याची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र सत्तास्थापनेसाठी नसलं तरी सिल्लोडमध्ये भाजप-ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारां उद्धव ठाकरे यांनीच भाजपला हाक दिली आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना उद्धव ठाकरे यांनी आपले मतभेद बाजूला ठेवू पण एकत्र येऊ असं जाहीरपणे म्हटल्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
निवडणुकीसंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
काही दिवसापूर्वी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आम्ही अब्दुल सत्तार यांचा प्रचार करणार नाही असे स्पष्टपणे कळवलं होतं. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभेत मंचावर आणि समोरील गर्दीतही पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. एकीकडे दररोज मोदी शहा फडणवीसांवर उद्धव ठाकरे हे हल्लाबोल करत आहेत पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघात त्यांनी भाजपाला सोबत येण्याचं आवाहन केलं. गद्दाराला गाडण्यासाठी, गुंडगिरी आणि सर्वसामान्याच्या छळ थांबवण्यासाठी एकत्र येऊ, असं ठाकरे म्हणाले आहेत.
कर्नाटकमध्ये महिलांवर अत्याचाराचे आरोप असलेल्या प्रज्वल रेवण्णाचा मोदी यांनी प्रचार केला होता. तर सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणारा उमेदवारही मोदींच्या मंचावर होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी अब्दुल सत्तार यांच्यावरील जमिनी बळकावणाच्या आरोपाची यादीही वाचून दाखवली. जमीन बळकावली. भूखंड बळकावले. शासकीय मालमत्ता याबाबतच्या यादीचं करायचे काय? याबाबत चौकशी करुन कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी सत्तारांना दिला आहे. 40 आमदार आणि मंत्रिपद देऊनही यांची भूकच शमत नाही. त्यामुळे सत्ता आली तर चौकशी करुन तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
शिवसेनेसंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
उद्धव ठारेंनी यावळे सिल्लोडमधील भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं. मतभेद असले तरी तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. ही संधी आहे. सिल्लोडमध्ये सत्तार यांच्या पराभवासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शिवसेनेची संस्कृती, विचार वेगळे आहेत. सभेत मुस्लिम भगिनी बसल्या आहेत. सत्तारांनी जमीन बळकावल्या. भूखंड पळवले. शासकीय मालमत्तांचा दुरुपयोग केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर भिंत बांधली, सर्वे नंबर 92 अनाधिकृत भूखंड ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.