Photo Credit :Social media
मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीनेही राज्यभरात चाचपण्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी मोर्चे, सभा, बैठकांचा वेग वाढला आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटप अद्याप झालेले नसले तरी ठाकरे गटाने मुंबईतील विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. मुंबईचा गड राखण्यासाठीठाकरे गटाने 18 नेते आणि 18 सहायकांवर मोठी जबाबदारी सोपवल्याची बातमी समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून राज्यातील 42 लोकसभा मतदारसंघातील शिव सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानतंर विधानसभेसाठी ठाकरे गटाने आता मुंबईचा गड राखण्यासाठी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांची मोर्चेबांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर महत्वाची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे खासदार संजय राऊत हेदेखील नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत.
हेदेखील वाचा: ऐतिहासिक वारसा लाभलेली आहेत हरियाणातील ‘ही’ खास ठिकाणे
विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 मतदासंघांसाठी उद्धव ठाकरे पक्षातील प्रमुख नेते आणि सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी 18 नेते आणि 18 पदाधिकाऱ्यांवर मुंबईतील 36 मतदारसंघांची जबाबदारी सोपवल्याची माहिती आहे. प्रत्येक नेत्याकडे दोन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. 25 ऑगस्टला उद्धव ठाकरेंकडे मुंबईसह इतर महाराष्ट्रातील सर्वेक्षण अहवाल सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा: जगातील 8 असे जीव ज्यांना मेंदू नाही
मुंबईतील मतदार संघांसाठी या नेत्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राजन विचारे: विलेपार्ले, कालिना
मिलिंद नार्वेकर: दिंडोशी, गोरेगाव
सचिन अहिर: कुलाबा, मुंबा देवी
विनायक राऊत : वरळी, दादर- माहीम
अनिल देसाई: जोगेश्वरी आणि अंधेरी
अनिल परब: मागाठाणे, दहिसर
विलास पोतनीस: शिवडी आणि मलबार हिल
वरून सरदेसाई: सायन कोळीवाडा, धारावी
सुनील प्रभू : मुलुंड, भांडुप
अजय चौधरी: चेंबूर, अणुशक्तीनगर
रमेश कोरगांवकर: बोरीवली, कांदिवली
मनोज जामसुतकर: चारकोप, मालाड
विनोद घोसाळकर: वडाळा, भायखळा
अमोल कीर्तिकर: घाटकोपर , मानखुर्द-शिवाजीनगर