वारणेचा 240 मेगावॉट वीजनिर्मिती जलविद्युत प्रकल्प चंदगडला (फोटो सौजन्य-X)
Ujani Dam News In Marathi : सोलापूर पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण मे महिन्यात 45 वर्षांत पहिल्यांदाच उपयुक्त साठ्यात (प्लसमध्ये) आले आहे. मॉन्सूनपूर्व पावसामुळे 21 मे रोजी उणे 23 टक्क्यांवर पोचलेला उचनीतील पाणी पातळी उणे दोन टक्क्यांवर आली आहे.
उजनी धरण आता प्लस मध्ये आले आहे. 122 टीएमसी चे असणारे उजनी धरण गेल्या आठवड्याभरातील पावसामुळे वधारून प्लस मध्ये आले आहे. सोमवारी दिवसभरात उजनी धरण तब्बल सात टक्क्यांनी वधारले गेले. सोमवारी (27 मे) सकाळी वजा सात टक्के असणारे उजनी धरण आता प्लसमध्ये येऊन पोहोचले आहे. त्यामुळे उजनी धरणाचा साठा जवळपास 64 टीएमसी इतका प्लसमध्ये आल्यावर झालेला दिसून येतो. वास्तवामध्ये उजनी धरण हे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात पुणे जिल्ह्यातील पावसामुळे प्लसमध्ये येते. मात्र यंदा प्रथमच मे महिन्यातच उजनी धरण हे वजा क्षमतेतून अधिक क्षमतेमध्ये आलेले आहे.
कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उजनीतून शेतकऱ्यांसाठी सलग ६० दिवस दोन आवर्तने सोडावी लागली. याशिवाय सोलापूर शहरासाठी भीमा नदीतूनही पाणी काढण्यात आले. म्हणून १८ एप्रिल रोजी धरणातील पाणीसाठा उणे पातळीत गेला होता. एका महिन्यांत धरणाची पातळी उणे 23 टक्के झाली होती. धरणाची पातळी २३ टक्क्यांनी वाढली असती. जिल्ह्यात मान्सूनचे आगमन आणि लवकर झालेल्या पावसामुळे यामुळे धरणाची पातळी यंदा मेअखेर उणे ५० टक्क्यांपर्यंत खाली जाईल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज होता. गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे, २३ टक्क्यांनी वाढलेला उजनी धरण आता २७ मध्ये रोजी प्लसमध्ये आहे. ४५ वर्षांत पहिल्यांदाच या महिन्यात धरणाची पातळी प्लसमध्ये आली आहे. धरणात सध्या दौंडवरून १९ हजार आणि धरण परिसरातील पावसाचा ११ हजार क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे.
उजनी धरणात अवघ्या दोन्ही दिवशी (२५ आणि २६ मे) साडेसात टीएमसी पाणी जमा झाले आहे. २५ मे रोजी उणे १६.९४ टक्के (५४.५८ टक्के) असलेले धरण २६ मे रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत उणे २.७३ टक्क्यांपर्यंत आले होते. त्यावेळी धरणात ६२.१२ टीएमसी पाणीसाठा होता. सध्याचा ३० हजाराचा विसर्ग असाच राहिल्यास पुढील १२ तासांत धरणात एक टीएमसीपेक्षा जास्त पाणी जमा होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.