संतापजनक! मंत्र्यांच्याच मुली सुरक्षित नाहीत, रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी काढली छेड
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात बलात्काराची घटना ताजी असताना केल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील यात्रेवेळी काही टवाळखोरांनी रक्षा खडसेंच्या मुलींसह अन्य मुलींची छेड काढली. याबाबत २ दिवसांपूर्वी तक्रार करूनही पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नाही, त्यामुळे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पोलीस स्टेशनमध्ये जात अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आहे.
मंत्र्यांच्याच मुली असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये घडला आहे. जळगावमधील मुक्ताई मंदिरात रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढली. धक्कादायक म्हणजे, पोलीस सुरक्षा रक्षक असतानाही टवाळखोरांनी छेड काढली. दरम्यान, टवाळखोरांवर योग्य ती कारवाई केली जाईल, महिला आयोगाकडून या घटनेचा पाठवुरावा केला जाईल, असे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.
रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत इतर मुलींसोबतही मुक्ताई मंदिरात छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर जळगावमध्ये एकच संतापाची लाट उसळली. मुलीची छेड काढल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली, पण पोलिसांकडून कारवाई झाली नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या रक्षा खडसे थेट पोलिस स्टेशनमध्ये पोहचल्या. पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली आहे.
तसेच या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घ्यावी. राजकीय दबावापोटी या गुंडांना अभय मिळत आहे. २ वर्षापूर्वी अशा काही घटनांबाबत पोलिसांना विचारणा केली तर मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला असं पोलीस सांगायचे. आता मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्यानंतर या घटना दडपल्या जात असतील तर दु्र्दैव आहे. मलाही राजकारणात ४५ वर्ष झाली, अशा घटना मी पूर्वी कधी अनुभवल्या नव्हत्या. मुली भीतीपोटी तक्रारी देत नाहीत. आपण स्वत: पुढाकार घेतला पाहिजे. गुंडाविरोधात कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: यात लक्ष घालावे यासाठी मी चर्चा करणार आहे असं एकनाथ खडसेंनी सांगितले.
दरम्यान, माझ्या जवळचा असेल किंवा कुणाच्याही जवळ असला तरी हा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या जवळचा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ज्या ज्या मुलींनी गुन्हा नोंद केला आहे त्यातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे. कोर्टाच्या माध्यमातून जामीन मिळवू न देणे यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजे. पोलीस गणवेशात असतानाही त्यांना मारहाण करण्याची हिंमतच कशी होते, हे कुठे ना कुठे अती झाले आहे. याला आळा बसणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी दिली.