अकलुज : राज्यभरात थैमान घातलेल्या लम्पी स्किन आजाराची माळशिरस तालुक्यातही लागण लागल्यामुळे पशुपालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, वैद्यकीय विभागाकडून लसीकरण मोहिम राबविली आहे. सुमारे ८००० जनावरांना लस दिली. परिणामी, रोग आटोक्यात आल्यामुळे बाधित जनावरांची संख्या वाढली नसून, बाधित जनावरे उपचारानंतर चांगल्या स्थितीत आली आहेत.
माळशिरस तालुक्यातील सिंगोणी येथे नऊ संकरित गाई मध्ये लक्षणे आढळली होती. यानंतर पशुवैद्यकीय विभागाने पाच किलोमीटर परिसरात रिंग व्हॅक्सनेशन पद्धतीद्वारे शिंगण बचेरी काळमवाडी आदी गावांतील आजारावर नियंत्रण मिळवले असून एकूण ४५०० जनावरांना लसीकरण केले आहे. आणखी एका आठवड्यानंतर परिस्थितीचा अंदाज येणार आहे, मात्र सध्या तरी पशुपालकांना दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली असल्याचे शिंगण बीटचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अहमद मुल्ला यांनी सांगितले.
तालुक्यात ३ ऑगस्ट रोजी लम्पीने बाधित जनावरांची स्थिती सुधारली असून जीवितहानी झालेली नाही. या आजाराबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र भीतीची गरज नाही. गोठ्याची स्वच्छता, शेजारी असलेल्या गवतावर तणनाशके फवारणी, गोचीड माशा, चिलटे, मच्छर आदींचा बंदोबस्त करण्याची काळजी घ्यावी. प्राथमिक उपायोजनांच्या माध्यमातून या रोगापासून बचाव करणे शक्य आहे.
[blockquote content=”जनावरे बाधित सापडली असून १६ दिवसांच्या कालावधीनंतर प्रसार थांबल्यास या मोहिमेत यश मिळाल्याचे निश्चित होणार आहे. सध्या पशुवैद्यकीय विभागाने ११ हजार लस उपलब्ध केल्या आहेत. ४५०० च्या आसपास औषधोपचार केले. आणखी २० हजार लसींची अतिरिक्त मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी माळशिरस तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शहाजी ठवरे यांच्यासह १५ डॉक्टरांच्या टीमने लसीकरण करून लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला.” pic=”” name=”आयुक्त डॉ. भास्कर पराडे पाटील, डॉ. नवनाथ नरळे”]
प्रमोद बाबर सहाय्यक आयुक्त अकलूज व डाॅ नानासाहेब सोनवणे उपायुक्त सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार माळशिरस तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शहाजी बरे, डॉ. दीपक शेडगे, डॉ. अहमद मुल्ला, डॉ. अतुल चुकेवार, डॉ. अविनाश रेडे-पाटील, डॉ. राजमाने, डॉ. पवार, डॉ. कौलगे यांच्या टीमने लसीकरण करून औषधोपचार केले आहेत. या परिसरातील बाधित जनावरांची संख्या आटोक्यात आली आहे. बाधित झालेल्या जनावरांच्या दुधामुळे कोणालाही अपाय होत नाही. ज्यांना शंका वाटते त्यांनी दूध चांगले तापवून उकळूनच वापरावे, असेही आवाहन केले आहे. सध्या बाधीत जनावरे ६ आहेत. आजारातून बरी झालेली जनावरे १३ आहेत.
[read_also content=”भाजपच्या नेत्यांची उडाली झोप; जिल्हा परिषदेची कामे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वाट्याला https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-leaders-lose-sleep-zilla-parishad-works-for-congress-and-ncp-nrdm-327012.html”]
लंपी या आजाराचा मानवाला कोणताही धोका नाही
सध्या लंपी या आजाराची जनावरांना काही ठिकाणी लागण होत आहे. अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. दुधापासून माणसाला काही धोका होतो का? अशा प्रकारची विचारणा माळशिरस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांच्याकडे होत आहे. या अनुषंगाने डॉ. मोहिते म्हणाले, लंपी या आजाराची अद्याप पर्यंत माणसाला लागण झाल्याची घटना ऐकण्यात नाही. तसेच दुधापासून माणसाला लागण झाल्याची घटनाही ऐकण्यात नाही. तरी पण एक काळजी म्हणून आपण जनावराचे दूध उकळून किंवा चहामध्ये पिण्यास कुठली हरकत नाही. असे आवर्जून त्यांनी सांगितले. ते पुढे बोलताना म्हणाले की, कुठलेही दुग्धजन्य पदार्थ उकळलेल्या दुधापासून केले असल्यामुळे ते खाण्यास कुठली हरकत नाही. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता दूध पिण्यास हरकत नाही, असे सांगितले.