मुंबई – फॉक्सकॉन प्रकल्पावरून राजकीय स्वार्थापोटी नाकारात्मक दावे केले जातायेत असा आरोप, राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी एक ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. रिफायनरी प्रकल्पावरून त्यांनी विरोधकांना चांगलेच फटकारले आहे. राजकीय स्वार्थापोटी चुकीचे, नाकारात्मक, निराधार दावे करण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
पुढे फडणवीस यांनी म्हटले आहे की, साडेतीन लाख कोटी रुपयांच्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध कोणी केला, त्याबरोबरच हा प्रकल्प कोणी लांबविला, असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला विरोधकांना विचारला आहे.
महाराष्ट्रात तब्बल दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून सुमारे दीड लाख नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता असलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने राजकीय वादंग निर्माण झालेला आहे. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी नेटाने उत्तरे द्यायचा प्रयत्न करत आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर असल्याने त्यांची भूमिका कळू शकलेली नव्हती. अखेर फॉक्सकॉन कंपनीच्या मालकांनी केलेल्या एका ट्विटचा हवाला देत वेदांता-फॉक्सकॉनने दुसऱ्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतलाय, असे सांगत फडणवीसांनी विरोधकांच्या टीकेची धार कमी करण्याचा प्रयत्न केला.