RCB Vs DC Live streaming (फोटो- सोशल मिडिया)
दिल्ली कॅपिटल्स 75 रन्सवर ऑल आउट
दिल्लीच्या संघाचा रनरेट मोठ्या प्रमाणात घसरला
आरसीबीचा दिल्लीवर दणदणीत विजय
Tata IPL 2026 DC Vs RCB Live Updates: आज दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने प्रथम (RCB Vs DC) गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या संघाची दाणादाण उडवली. दिल्लीने आरसीबीला 76 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा 9 विकेट्सने पराभव केला.
आरसीबीची फलंदाजी
दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 76 रन्सचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरसीबीकडून विराट कोहली आणि जेकब बेथेल हे सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. जेकब बेथेल 20 रन्स करून आउट झाला. त्यानंतर देवदत्त पाडीकल आणि विराट कोहलीने आरसीबीला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने 23 तर देवदत्त पाडीकलने 34 रन्स केल्या.
दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी
दिल्ली कॅपिटल्सने 75 रन्सचा बचाव करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. काइल जेमिसनने जेकब बेथेलची विकेट पटकावली.
RCB Vs DC Live: भुवी-हेझलवूडचं ‘डेडली’ कॉम्बिनेशन! दिल्लीचं कंबरडं मोडलं, 100 मध्ये गेम ओव्हर
दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी
आरसीबीने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी साहिल पारख आणि केएल राहुल सलामीची जोडी मैदानात उतरली. आज डेब्यू करणारा साहिल पारख पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला. दुसऱ्याच चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची गाडी वेगाने रुळावरून घसरली.
मागच्या सामन्यात दीड शतक केलेल्या केएल राहुल केवळ 1 रन करून आउट झाला. नितीश राणाने 9 बॉल खेळून 1 रन केली. तो 1 रन करून आउट झाला. तसेच दिल्लीचे फलंदाज लागोपाठ आउट झाले. पहिल्या दोन सामन्यात चांगली खेळी करणारा समीर रिझवी सातत्याने चांगली फलंदाजी करण्यात अपयशी ठरत आहे. तो देखील शून्यावर आउट झाला. स्टब्स देखील आज केवळ 5 रन्स करून आउट झाला. कर्णधार अक्षर पटेल शून्यावर आउट झाला. डेव्हिड मिलरने दिल्लीचा साव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो 19 रन्स करून आउट झाला.
Meet the first player to scale Mt. 9️⃣0️⃣0️⃣0️⃣ in the #TATAIPL! 🏔️ The man, the myth, the ultimate run-machine – Virat Kohli 🫡 Updates ▶️ https://t.co/HIiNNEutP0 ##KhelBindaas | #DCvRCB | @imVkohli pic.twitter.com/z1PI1oshiJ — IndianPremierLeague (@IPL) April 27, 2026
आरसीबीची गोलंदाजी
आरसीबीने आज अत्यंत अचूक आणि भेदक गोलंदाजी केली. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडने पॉवर प्लेमध्ये दिल्लीची दाणादाण उडवली. भुवनेश्वर कुमारने अत्यंत अचूक गोलंदाजी करत तीन विकेट्स पटकवल्या. भुवनेश्वर कुमारने साहिल पारख, स्टब्स आणि कर्णधार अक्षर पटेलची विकेट घेतली. त्यापाठोपाठ हेझलवूडने केएल राहुल आणि नितीश राणा, समीर रिझवीची विकेट घेतली. सलाम डारने डेव्हिड मिलरची विकेट घेतली.
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल, पॅथुम निसांका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिझवी, कुलदीप यादव, मुकेश कुमार, लुंगी एन्गिडी, टी. नटराजन, विप्रज निगम, करुण नायर.
RCB Vs DC Live: रजत पाटीदारने जिंकला टॉस; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
आरसीबीची संभाव्य टीम: विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार),जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पांड्या, रोमारिओ शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, सुयश शर्मा, रसीख सलाम, यश दयाल.






