मुंबई : लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) निकाल मंगळवारी (दि.6) जाहीर झाले. त्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडीला भाजपपेक्षा सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. यामध्ये उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून (Mumbai North Central) काँग्रेसच्या वर्षा गायकडवाड विजयी झाल्या. या विजयानंतर आज त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली.
वर्षा गायकवाड यांनी या भेटीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. उद्धव ठाकरेंनी सगळ्या ठिकाणी सभा घेतल्या होत्या, दौरे केले होते. त्यांनी जे जनतेला आवाहन केले होते, त्याप्रती त्यांना आज आम्ही भेटायला आलो. त्यांनी सांगितलं होते की, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी द्या, तेथून माझ्या यशाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात, मुंबई महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने एकमताने काम केलं. त्यांचा परिणाम आम्हाला घवघवीत यश मिळालं.
तसेच शिवसेना, राष्ट्रवादी, शेकाप, समाजवादी पार्टी असेल सगळ्यांनी आम्हाला मदत केली. आनंद या गोष्टीचा आहे, मुंबईत 5 जागा आम्ही जिंकलो. मुंबई काँग्रेसची अध्यक्ष म्हणून मी आज उद्धव ठाकरे यांना भेटायला आले आहे. येणाऱ्या काळामध्ये काम करताना त्याचं मार्गदर्शन आम्हाला प्रेरणादायी आहे. येणाऱ्या विधानसभेची सुद्धा आम्ही चांगली तयारी करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.