Photo Credit- Team Navrashtra हक्कभंग म्हणजे नेमकं काय, कशी असते प्रकिया, अन् काय होते शिक्षा?
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक टीकेमुळे कॉमेडियन कामराविरोधात मुंबईतील काही पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुणाल कामाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढी, चष्मा आणि शिवसेना पक्षातील बंड यावर आधारित एक विडंबनात्मक गाणे सादर केले. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर काही शिवसैनिक संतप्त झाले आणि त्यांनी गाणं सादर झालेल्या स्टुडिओची तोडफोड केली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचा देखील हे गाणे गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडीओंनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
दुसरीकडे या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळातही उमटल्याचे पाहायला मिळाले. विधानपरिषदेचे सदस्य आणि आमदार प्रविण दरेकर यांनी या प्रकरणावर आक्षेप घेत बुधवारी, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, आता या हक्कभंग प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
नोकरीच्छुक उमेदवारांना दिलासा; राज्यात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम
विधान परिषद सदस्य प्रविण दरेकर यांनीबोलताना म्हणाले की, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वापरलेली खालच्या पातळीतील भाषा आणि कुणाल कामराने उपमुख्यमंत्र्यांवर केलेले वैयक्तिक आणि उपरोधिक गाणे हे विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे. त्यामुळे या दोघांविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यास अनुमती द्यावी, अशी त्यांनी विनंती केली. प्रवीण दरेकरांच्या विनंतीवर सभापती राम शिंदे यांनी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे योग्य कारवाईसाठी सुपूर्द करत असल्याचे जाहीर केले होते. यानंतर सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव स्वीकारण्यात आल्याची माहिती आहे.
सभापती राम शिंदे यांच्या स्वाक्षरीनंतर हा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवला आहे. ही समिती लवकरच या दोघांना खुलासा करण्यासाठी नोटीस पाठवू शकते. पुढील टप्प्यात सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा या हक्कभंगावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘सिकंदर’च्या रिलीजआधी रश्मिका मंदानाचं मोठं वक्तव्य; म्हणाली, “मी टेंशनमध्ये आहे कारण…
हक्कभंग (Breach of Privilege) म्हणजे संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या सदस्यांच्या अधिकारांचे उल्लंघन करणे किंवा त्यांच्या कार्यात अडथळा आणणे. संसदेचे आणि विधिमंडळांचे काही खास हक्क आणि विशेषाधिकार असतात, जे त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असतात. जर कोणी व्यक्ती, संस्था किंवा अगदी एखादा सदस्य स्वतः या हक्कांचे उल्लंघन करत असेल, तर तो “हक्कभंग” मानला जातो.
हक्कभंगाचे प्रकार:
1. सभागृहाच्या कार्यात अडथळा आणणे
2. सदस्यांना धमकी देणे किंवा दबाव टाकणे
3. सभागृहाबाहेरील व्यक्तींनी संसदेच्या सन्मानास धक्का पोहोचवणे
4. न्यायालयाने संसद सदस्यांच्या विशेषाधिकारांचे उल्लंघन करणे
– शिक्षा विविध प्रकारच्या असू शकतात:
– समज देणे किंवा इशारा देणे.
– सभागृहात माफी मागण्यास सांगणे.
– संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या सभासदांनी हक्कभंगाचा आरोप केल्यास, संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाते.
– संबंधित सभागृहाच्या विशेषाधिकार समितीने चौकशी केल्यानंतर निर्णय घेतला जातो.
– तात्पुरते किंवा कायमस्वरूपी निलंबन.
– तुरुंगवास (अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये).
– प्रसारमाध्यमांद्वारे चुकीची माहिती दिल्यास, संबंधित माध्यमावर कारवाई केली जाऊ शकते.






