शापूर झद्रानचे निधन (फोटो- ians)
शापूर जादरानचा उद्या 39 वा वाढदिवस होता. दिल्ली-NCR मधील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपुरी ठरली. ७ जुलै २०२६ रोजी वयाच्या ३८ व्या वर्षी त्याची प्राणज्योत मालवली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियाद्वारे या दुःखद वृत्ताला दुजोरा दिला असून त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
शापूर जादरान गेल्या काही महिन्यांपासून ‘हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टिओसायटोसिस’ (HLH) या अत्यंत गंभीर आजाराशी झुंज देत होता. त्याच्यावर दिल्ली-एनसीआर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्याची प्राणज्योत मालवली आहे. या रोगामुळे शरीरातील पेशी आणि अवयवांना नुकसान होते. अशा दुर्मिळ आजाराशी तो झुंज देत होता.
إِنَّا لِلّهِ وَإِنَّـا إِلَيْهِ رَاجِعُونَ With profound grief and deep sorrow, the Afghanistan Cricket Board mourns the passing of former Afghanistan fast bowler Shapoor Zadran. Shapoor Zadran was one of the foundation-laying figures of Afghanistan cricket, whose dedication,… pic.twitter.com/iPIAJ6HLkq — Afghanistan Cricket Board (@ACBofficials) July 7, 2026
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची प्रतिक्रिया काय?
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात शापूर जादरान आजारी पडला होता. त्यानंतर अफगाणिस्तानच्या डॉक्टर्सने त्याला भारतात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. भारतात उपचार घेतल्यावर त्याला बारे वाटू लागले. त्याला डीस्चार्ज देण्यात आला. मात्र काही दिवसांनी पुनः त्याची ताब्यात बिघडली. शापूर जादरान हा अफगाणिस्तान क्रिकेटचा पाया रचणाऱ्या प्रमुख खेळाडूंपैकी एक होता. त्याचे समर्पण, खेळावरील प्रेम आणि अढळ वचनबद्धतेमुळेच आज अफगाण क्रिकेट इंटरनॅशनल स्तरावर पोहोचण्यास मदत झाली आहे.
क्रिकेटविश्व हादरलं! Team India मध्ये घडामोडींना वेग; ‘हा’ खेळाडू असणार नवा हेड कोच, कारण काय?
अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर जादरान याने आपल्या संघाला जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी फार मेहनत आणि कष्ट घेतले. त्याने अफगाणिस्तानसाठी वनडे आणि टी 20 सामने खेळले आहेत. त्याची वेगवान गोलंदाजी चाहत्यांना आवडत असे. वर्ल्डकप आणि टी 20 वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानसाठी खेळणाऱ्या खेळाडूंपैकी तो एक महत्वाचा खेळाडू होता.
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूचे योगदान अत्यंत चांगले असे राहिले आहे. त्याने अफगाणिस्तानच्या संघासाठी आतापर्यंत 44 एकदिवसीय सामने, 36 टी 20 सामने खेळले आहेत. त्याने 44 सामन्यांत 43 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने टी 20 क्रिकेटमध्ये 37 विकेट्स घेतल्या आहेत. फारस्ट क्लास क्रिकेटमध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी करत अनेक विकेट्स मिळवल्या आहेत. त्याने शेवटचा सामना 10 मार्च 2019 मध्ये डेहराडून येथे आयर्लंडविरुद्ध खेळला होता. त्याच्या दु:खद निधनाने क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे.






