भिगवण : संपूर्ण राज्यामध्ये अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भिगवण (ता. इंदापूर) येथील शाखेला विकास अधिकारी मिळेल का?, अशा प्रकारची विनवणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून भिगवण शाखेला कायमस्वरूपी विकास अधिकारी नसल्यामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज, तसेच मध्यम मुदत, पाईपलाईन, अवजारे अशा प्रकारचे कर्ज मिळण्यासाठी विलंब होत आहे. अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराच्या फासातून सुटण्यासाठी केलेली धडपड वाया जात आहे. शेतकऱ्यांना नाईलाजाने पुन्हा सावकाराच्या दारात जाण्याची वेळ आली आहे.
याबाबत सविस्तर मिहीती अशी की, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भिगवण शाखेतील विकास अधिकारी टी. टी. वाबळे यांचा गेल्या तीन महिन्यांपूर्वी अपघात झाल्यामुळे ते रजेवर आहेत. त्यांच्या जागेवर विकास अधिकारी नंदकुमार गायकवाड यांची भिगवण शाखेसाठी नेमणूक करण्यात आली आहे. परंतु, नंदकुमार गायकवाड यांना शेटफळगढे( ता. इंदापूर) अकोले( ता. इंदापूर) व भिगवण( ता. इंदापूर) अशा तीन गावातील जिल्हा मध्यवर्ती शाखेचा कारभार पाहण्याची जबाबदारी असल्यामुळे आठवड्यातून दोनच दिवस ते भिगवण शाखेसाठी उपलब्ध होत आहेत. परिणामी वेळेत भिगवण शाखेचा कारभार करण्यासाठी कालावधी कमी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना तसेच विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सचिवांना कर्ज वितरण करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
[blockquote content=”माझ्याकडे तीन शाखेचा कारभार असल्यामुळे मी शक्य होईल तेवढे शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्याची व्यवस्था करीत आहे. डिसेंबर महिना अखेर भिगवण शाखेत तब्बल ६५ शेतकऱ्यांना मी पीक कर्ज वितरण केले आहे. माझ्याकडून कुठल्याही शेतकऱ्यांची आडवणूक होत नाही. तरीसुद्धा शाखेचे कारभार गतिमान होण्यासाठी प्रत्येक शाखेला स्वतंत्र विकास अधिकारी असणे आवश्यक असून हा निर्णय विभागीय अधिकारी यांच्याकडे आहे.” pic=”” name=”- नंदकुमार गायकवाड, विकास अधिकारी, पीडीसीसी बँक. “]
[blockquote content=”जिल्हा बँकेच्या भिगवण शाखेला विकास अधिकारी नेमणूक करणे बाबत विलंब झाला आहे परंतु एवढ्या आठवड्यात विकास अधिकारी ची नेमणूक करून शेतकऱ्याची होणारी अडचण कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.” pic=”” name=”- ए. बी. थोरात, विभागीय अधिकारी, पीडीसीसी.”]






