पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. अनेकदा पत्रकार परिषद आणि भाषणांमध्ये राज ठाकरेंच्या या स्वभावाचा अंदाज अनेकांना पहायला मिळाला आहे. सध्या पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंची नाराजी स्थानिक पत्रकारांनी ओढवून घेतली.
रात्री नऊ वाजता राज ठाकरे पुण्यातील बाजीराव रोडवरील अक्षरधारा बुक गॅलरीत पुस्तक खरेदी करण्यासाठी आले होते. पत्रकारांना याबद्दलची माहिती मिळताच त्यांची बुक गॅलरीबाहेर गर्दी केली.
[read_also content=”स्मृती इराणींच्या विरोधात आंदोलन राष्ट्रवादीला भावले; 40 ते 50 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल https://www.navarashtra.com/maharashtra/the-movement-against-the-smriti-iranians-made-the-ncp-feel-crimes-filed-against-40-to-50-activists-nrdm-281246.html”]
राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा आल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्याच्या लाईटचा राज ठाकरेंना त्रास व्हायला लागला. त्यानंतर त्यांनी उपस्थित पत्रकारांना जगू द्याल की नाही? बंद करा तो लाईट, प्रत्येकाला वेगळं सांगत बसू का? असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली.