अमरावती : बचत गटामुळे (Savings group) महिलांना संधी मिळाली आहे. त्या संधीचे सोने करा. सक्षम आणि साक्षर दोन्हींमध्ये अव्वल राहत महिलांनो स्वत:चे अस्तित्व जपा असा मौलिक सल्ला माजी महिला व बाल विकास मंत्री (Former Women and Child Development Minister ) अॅड. यशोमती ठाकूर (Adv. Yashomati Thakur) यांनी महिलांना दिला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (Maharashtra State Rural Development Mission ) अंतर्गत पंचायत समिती तिवसा (Panchayat Samiti Tivasa ) तर्फे आयोजित कुर्हा येथील वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तिवसा पंचायत समिती यांच्यामार्फत कल्पतरु प्रभाग संघ कुर्हा यांची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे पार पडली. या कार्यक्रमास तिवसा मतदार संघाच्या आमदार तथा राज्याच्या माजी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी त्यांनी व्यासपीठावरून हजारो महिलांशी संवाद साधला. तसेच कल्पतरु प्रभाग संघ कुर्हा यांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन केले. कल्पतरू प्रभागसंघ अंतर्गत समाविष्ट सोळा ग्रामपंचायतीमध्ये २३ ग्रामसंघाअंतर्गत ४१६ स्वयं सहाय्यता बचत गटामध्ये समाविष्ट ४,१५९ कुटुंबाना फिरता निधी, २१४ बचत गटांना रुपये ३१.९२ लाख एवढा निधी प्राप्त झाला. तसेच समूह कर्ज म्हणून २१४ गटांना रुपये ३२.१ लाख मिळाले. तसेच कल्पतरू प्रभागसंघ कुर्हा येथील १,२९४ महिलांचे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा काढले.
तसेच, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना संख्या २,३१२ तसेच ग्रामसंघांना ग्रामसंघ व्यवस्थापन निधी प्राप्त रु ६.५ लाख मिळाले. तसेच, जोखीम प्रवणता निधी रु ७५ हजार मिळाले. तसेच उकऋ ८ समूह ३.६० लाख रु मिळाले. तसेच कल्पतरू प्रभाग संघ अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेत ११ स्वयं सहाय्यता बचत गटांना ५.२० लाख रुपये मिळाले. याबद्दल ठाकूर यांनी कल्पतरु प्रभागसंघातील सर्व महिलांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.