Yavatmal News: बोगस बियाण्याचा फटका! साडेसहा एकरातील सोयाबीन उगवलंच नाही, संतप्त शेतकऱ्याने फिरवला रोटावेटर
यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाच्या अनिश्चिततेनंतर पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांना आता निकृष्ट बियाण्यांचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. त्यांनी जून महिन्याच्या अखेरीस साडेसहा एकर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणीपूर्व मशागत, बियाणे, खते आणि इतर खर्चासाठी त्यांनी हजारो रुपये खर्च केले. मात्र, पेरणीनंतर अपेक्षित उगवण झाली नाही. (फोटो सौजन्य – AI Created)
शेतात सोयाबीनऐवजी केवळ तण दिसून आल्याने त्यांनी अखेर संपूर्ण क्षेत्रावर रोटावेटर फिरवून पीक नष्ट केले. याबाबत त्यांनी संबंधित बियाणे कंपनीकडे तक्रार केली होती. कंपनीच्या प्रतिनिधींनी शेताची पाहणी केली; मात्र केवळ पाहणी करून नुकसान भरपाई मिळणार नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. बियाण्याच्या निकृष्टतेमुळे साडेसहा एकर क्षेत्रातील पीक हातचे गेले असून, केलेला खर्च वाया गेल्याचे गोटफोडे यांनी सांगितले.
चौकशी करून नुकसानभरपाईची मागणीः या प्रकरणात संबंधित बियाण्याची गुणवत्ता, उगवण क्षमता आणि विक्री प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. बियाणे निकृष्ट असल्यास संबंधित कंपनी व दोषींवर कारवाई करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.
गोटफोडे यांनी हिरव्यागार सोयाबीन पिकाचे स्वप्न रंगवले होते. मात्र, शेतात सोयाबीनऐवजी तणाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्याने संतप्त होऊन त्यांनी संपूर्ण शेतात रोटावेटर फिरविला. काही दिवसांपूर्वी चांगल्या पिकाची आशा असलेल्या शेतात पुन्हा माती उलटविण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांच्या हतबलतेचे चित्र समोर आले आहे.
पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीचा वाद पेटला; सुनील टिंगरेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलाच पण त्यात बियाण्याची उगवणही झाली नाही. साडेसहा एकर क्षेत्रासाठी मशागत, बियाणे व पेरणीवर हजारो रुपये खर्च केले, कंपनीच्या प्रतिनिधींनी पाहणी केली; मात्र माझ्या नुकसानाचे काय, हा प्रश्न कायम आहे. शेतात सोयाबीनाऐवजी केवळ तणकट ठरल्याने अखेर रोटावेटर फिरवावा लागला.






