युगेंद्र पवार (फोटो- ट्विटर)
डोर्लेवाडी: पवार साहेबांच्या विचारांसाठी गद्दारी विरोधात लढलो, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी केले. राज्याच्या विधानसभा निवडणुक निकालानंतर बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे आभार मानण्यासाठी युगेंद्र पवार यांनी आभार दौरा सुरू केला आहे. झारगडवाडी (ता. बारामती) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अस्तित्व टिकवायचे आहे. तेथील जवळपास तीन हजार बोगस सभासदां विरोधात कोर्टात केस चालू आहे. येणाऱ्या निवडणुकीत बोगस मतदारांचे आवाहन रोखायचे आहे. निवडणूक बॅलेट पेपरवर असली तरी, एक एक मत महत्त्वाचे आहे. सत्ताधारी लोकशाहीचा गळा घोटून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतील पण सभासदांनी योग्य निर्णय घ्यायचा आहे.
अजित पवार-
युगेंद्र हा व्यावसायिक असून त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. लोकसभेला माझी चूक झाली, हे मी सर्वांना सांगून दमलो. तरीही माझ्या सख्ख्या पुतण्याला माझ्या विरोधात उभं करायचं काहीच कारण नव्हतं. माझी चूक झाली, म्हणजे घरातलाच माणूस उभा करायचा काय? असेही ते म्हणाले. महाराष्ट्राचा पाया रचण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले, यामुळे महाराष्ट्र कदापि त्यांना विसरणार नाही. शिव, शाहू, फुले, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानेच आम्ही पुढे जाण्याचे काम चालू ठेवणार आहे. यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या दिशेने मार्गाने आपण सर्वांनी पुढे जाणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारांने आम्ही महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी एका विचाराने प्रयत्न करणे गरजेचे आहे.






