Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZP Elections Live Updates : मुंबईचे महापौर म्हणून भाजपच्या रितू तावडे तर शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर

ZP and Panchayat Samiti Elections Live Updates : राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह पंचायत समितीची निवडणूक होत आहे. त्यासाठी आज मतदान पार पडणार आहे. त्यानुसार, प्रशासनाकडून तयारी केली गेली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 07, 2026 | 05:51 PM
Assembly Elections : केरळ, आसाम आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण

Assembly Elections : केरळ, आसाम आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking News Updates : राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह पंचायत समितीची निवडणूक होत आहे. त्यासाठी आज मतदान पार पडणार आहे. त्यानुसार, प्रशासनाकडून तयारी केली गेली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान पार पडणार आहे.

जिल्हा परिषदेच्या ७३१ तर आणि पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ७ हजार ४३८ इतके उमेदवार निवडणूक रिंगणात असून, सर्व मिळून एकूण २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ इतकी मतदार संख्या आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी पुरेशा पोलिस बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे मतदान पुढे ढकलण्यात आले.

The liveblog has ended.
  • 07 Feb 2026 05:32 PM (IST)

    07 Feb 2026 05:32 PM (IST)

    पूल नाही तोपर्यंत मतदान नाही! गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार

    परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात चिकलठाणा जिल्हापरिषद सर्कलमधील बोथ व बोथ तांडा या गावांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. गावाला जाण्यासाठी रस्ता नसणे आणि नदीवर पूल न बांधल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मूलभूत सोयी उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी ग्रामस्थांनी एकत्र येत ईश्वर साक्षीने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

  • 07 Feb 2026 05:23 PM (IST)

    07 Feb 2026 05:23 PM (IST)

    मतदार केंद्रावरील प्रशासनाला कडक शब्दात सुनावले

    पंढरपूर शहरातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते झेडपी मतदान केंद्रावर 100 मीटरच्या आत फिरू लागल्याने मतदानाला आलेले शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पोलिसांनी प्रशासनाला कडक शब्दात सुनावले. भाजप कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई करीत नसल्याचे पाहून खासदार मोहिते पाटील चांगले संतापल्याचे दिसत होते. त्यानंतर पोलिसांनी शंभर मीटरच्या परिसरात करणाऱ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.

  • 07 Feb 2026 05:14 PM (IST)

    07 Feb 2026 05:14 PM (IST)

    जिल्हा परिषद मतदान टक्केवारी...

    सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी साडे सात वाजल्यापासून 3.30 पर्यंत 46.99 टक्के मतदानाची नोंद.

    सिंधुदुर्ग- मतदान टक्केवारी सकाळी 7:30 ते 3:30 पर्यंत 50.10 टक्के मतदान

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 53.43 टक्के मतदान झाले

  • 07 Feb 2026 04:55 PM (IST)

    07 Feb 2026 04:55 PM (IST)

    अभिषेक शर्माच्या रडारवर मोठा विक्रम! ‘ही’ कामगिरी करताच टी-20 मध्ये रचणार इतिहास

     बहुप्रत्यक्षित आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला आजपासून (७ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील तिसरा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि यूएसए यांच्यात खेळला जाणार आही. या सामन्यात भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा इतिहास रचण्याची शक्यता आहे.  जर अभिषेकने आजच्या सामन्यात ५ षटकार मारले तर तो भारतात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५० षटकार मारणारा पाचवा फलंदाज बनणार आहे.

  • 07 Feb 2026 04:50 PM (IST)

    07 Feb 2026 04:50 PM (IST)

    “गरज पडल्यास….”; EVM मध्ये बिघाड झाल्यावर रामदास कदम आक्रमक

    आज राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान सुरू आहे. राज्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी आज मतदान होत आहे. दरम्यान या निवडणुकीचा निकाल 9 तारखेला सोमवारी लागणार आहे. दरम्यान आज मतदान सुरू असताना अनेक ठिकामी मतदान यंत्र बंद पडणे किंवा त्यात बिघाड होणे असे प्रकार घडले. यावर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाष्य केले आहे.

  • 07 Feb 2026 04:45 PM (IST)

    07 Feb 2026 04:45 PM (IST)

    अमेरिकन बाजारपेठेत भारतीय मालाला सुकाळ! औषधे, हिरे आणि कपडे होणार स्वस्त; पाहा कोणत्या वस्तूंवर लागणार ‘Zero Duty’

    पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांच्यातील ‘मदर ऑफ ऑल डील्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यापार कराराचे तपशील आता समोर आले आहेत. या करारामुळे केवळ व्यापारी संबंधच सुधारले नाहीत, तर अमेरिकन ग्राहकांच्या खिशाला मिळणारा दिलासा आणि भारतीय निर्यातदारांचा नफा यात मोठी वाढ होणार आहे. विशेषतः ज्या वस्तूंवर पूर्वी ५०% पर्यंत कर होता, त्या आता १८% वर आल्या आहेत, तर काही अति-महत्त्वाच्या वस्तूंना चक्क ‘शून्य शुल्क’ (Zero Duty) प्रवेश मिळाला आहे.

  • 07 Feb 2026 04:40 PM (IST)

    07 Feb 2026 04:40 PM (IST)

    वैभव सूर्यवंशीला अटक करा! क्रिकेट मैदानावर हिंसाचार केल्याप्रकरणी कारवाईची मागणी; वाचा सविस्तर

    काल अंडर-१९ विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर भारत १९ वर्षांखालील आणि इंग्लंड १९ वर्षांखालील संघ यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करून अंडर-१९ विश्वचषक २०२६ चे विक्रमी सहावे जेतेपद पटकावले. या विजयात भारताचा स्फोटक सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने १७५ धावांची तुफानी पारी खेळली. या खेळी दरम्यान त्याने इतका गोंधळ घातला की परदेशी क्रिकेट मंडळाला कायदेशीर कारवाई आणि त्याच्या अटकेची मागणी करावी लागली. या “एक्स-रेटेड” घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

  • 07 Feb 2026 04:35 PM (IST)

    07 Feb 2026 04:35 PM (IST)

    चंद्रपुरात राजकारण तापलं! महापौरपदासाठी दोन्ही पक्षात वर्चस्वाची लढाई; कोणाची सत्ता स्थापन होणार?

    महानगर पालिकेची निवडणूक ही दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या वर्चस्वाची लढाई बनलेली आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरही कोणता पक्ष सत्ता स्थापन करणार अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही पक्षात उमेदवारी, एबी फार्म वाटपापासून सुरू झालेला वाद महापौर पदाचे नामांकन दाखल झाल्यानंतरही संपलेला नाही. त्यामुळे ‘कोळसा खाण’ अशी ओळख असलेल्या शहराचा महापौर नेत्यांच्या वर्चस्वाच्या लढाईत तापूण निघणार, अशा चर्चा आता शहरात रंगू लागलेल्या आहेत.

  • 07 Feb 2026 04:30 PM (IST)

    07 Feb 2026 04:30 PM (IST)

    ‘पैसा ही पैसा’…! गुंतवणूकदार मालामाल… 1 लाखाचे झाले 78 लाख, ‘हा’ शेअर बनला रॉकेट

    शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला अशी इच्छा असते की त्यांना असा स्टॉक मिळावा जो त्यांच्या गुंतवणुकीचा गुणाकार करेल, असे जादुई परतावे देणाऱ्या स्टॉकना मल्टी-बॅगर म्हणतात, परंतु ते ओळखणे कठीण असते. आज, या बातमीद्वारे, आम्ही तुम्हाला अशाच एका मल्टी-बॅगर स्टॉकबद्दल सांगणार आहोत ज्याने स्फोटक परतावा देऊन गुंतवणूकदारांचे नशीब बदलले आहे.

  • 07 Feb 2026 04:25 PM (IST)

    07 Feb 2026 04:25 PM (IST)

    ‘दादांच्या निधनामुळे प्रचारापासून दूर राहिलो’; मुरलीधर मोहोळ यांची भावूक प्रतिक्रिया

    “अजितदादांच्या जाण्याने आमच्या मनात मोठे दुःख आहे. निवडणुका येत-जात राहतील, पण या दुःखद काळात प्रचार करणे आम्हाला योग्य वाटले नाही,” अशी भावूक प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. राज्यात पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिली. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत त्यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.

  • 07 Feb 2026 04:20 PM (IST)

    07 Feb 2026 04:20 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा झेंडा फडकला! समीर राजूरकर महापौर तर राजेंद्र जंजाळ उपमहापौर

    राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका महापौर, उपमहापौर निवडीचा तिढा अखेरीस शुक्रवारी (६) सुटला. ५८ संख्याबळाला एक नगरसेवक कमी पडलेल्या भाजपने महायुतीतील मित्रपक्ष शिवसेनेला सोबत घेत महापालिकेवर सत्ता स्थापन होईल. बुधवारी वेगाने राजकीय घडामोडी होत महापौर म्हणून भाजपचे समीर राजूरकर तर उपमहापौर म्हणून शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शहराचे नामांतर औरंगाबादहून छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक ठरणार असल्याने छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे पहिले महापौर होण्याचा मान भाजपाचे नगरसेवक समीर राजूरकर यांना तर उपमहापौर होण्याचा मान शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना मिळणार आहे.

  • 07 Feb 2026 04:10 PM (IST)

    07 Feb 2026 04:10 PM (IST)

    टीव्ही पाहण्यावरून आईची ओरड, 12 वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल

    एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या ओरडण्यामुळे एका १२ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलाला त्याच्या आईने सतत टीव्ही पाहत असल्याच्या कारणावरून ओरडलं होतं. त्यांनतर पीडित मुलाची आई कामावर गेली. घरात कोणीच नसतांना त्याने टोकाचे पाऊल उचललं. ही घटना उत्तर प्रदेश येथील नोएडा येथे घडली.

  • 07 Feb 2026 04:05 PM (IST)

    07 Feb 2026 04:05 PM (IST)

    नात्यांचा गुंता आणि प्रेमाची गोडी, उमेश – प्रियाची ‘बिन लग्नाची गोष्ट’ ॲमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग

    नात्यांचा गुंता, प्रेमातील गोडवा आणि हलकीफुलकी नोकझोक यांचा सुरेख संगम असलेला ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा मराठी चित्रपट सध्या ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर ट्रेंडिंग ठरत आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

  • 07 Feb 2026 03:50 PM (IST)

    07 Feb 2026 03:50 PM (IST)

    फुलकिडीमुळे आंबा बागायतदार चिंतेत; शेतकऱ्यांची नितेश राणेंकडे ‘ही’ मागणी

    देवगड तालुक्यात आंबा पिकावर आलेल्या गंभीर अरिष्टाच्या पार्श्वभूमीवर आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ, देवगड यांच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन सध्याची भीषण परिस्थिती मांडली. यावेळी आंबा उत्पादनावर झालेल्या परिणामाची सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांना तातडीच्या दिलासादायक उपाययोजनांची मागणी करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष विलास रूमडे यांच्या नेतृत्वाखाली आंबा बागायतदारांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन हे निवेदन देण्यात आले. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आल्याने यंदा भरघोस उत्पादनाची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र मोहोरासोबत पालवीही मोठ्या प्रमाणात आल्याने तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव वाढला.

  • 07 Feb 2026 03:45 PM (IST)

    07 Feb 2026 03:45 PM (IST)

    चूक कोणाची? भरधाव ऑटो आणि दुचाकीची जोरदार धडक; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL

    सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ इतके भयंकर असतात की पाहून कोणाचाही थरकाप उडेल. यामध्ये भीषण अपघाताचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक भयावह अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. एक ऑटो भरधाव वेगात असताना असे काही घडले आहे की पाहून तुमचाही थरकाप उडेल.

  • 07 Feb 2026 03:35 PM (IST)

    07 Feb 2026 03:35 PM (IST)

    नेदरलॅंडची एक चूक अन् सामना गमावला! पाकिस्तानने 3 विकेट्सने मिळवला विजय…

    टी20 विश्वचषक 2026 चा पहिला सामना हा पाकिस्तान विरूद्ध नेदरलॅंड यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यामध्ये नेदरलॅंडच्या संघाने कमालीची कामगिरी केली पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेची सुरूवात पाकिस्तानच्या विजयी केली आहे. टी20 विश्वचषक 2026 चा पहिला सामना पाकिस्तानने नेदरलॅंडविरूद्ध 3 विकेट्सने जिंकला आहे. या सामन्यामध्ये दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.

  • 07 Feb 2026 03:30 PM (IST)

    07 Feb 2026 03:30 PM (IST)

    सांगलीत पर्यावरणासाठी मतदानावर बहिष्कार; बलगवडे गावातील मतदारांनी फिरवली पाठ

    तासगाव तालुक्यातील बलगवडे गावाने सौर ऊर्जा प्रकल्पासाठी प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात तीव्र भूमिका घेत आज सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकला आहे. ग्रामस्थांनी याबाबत आधीच इशारा दिला होता आणि आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही गावातील मतदारांनी मतदान केंद्रांकडे पाठ फिरवली.

  • 07 Feb 2026 03:20 PM (IST)

    07 Feb 2026 03:20 PM (IST)

    देवर्डे येथे EVM बिघाडामुळे अर्धा तास मतदान प्रक्रिया ठप्प, मतदान केंद्रावर गोंधळ, नागरिक संतप्त

    राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रभर मतदानासाठी मोठा उत्साह आहे आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोक मतदान केंद्रांवर गर्दी करत आहेत. अशातच सांगलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील देवर्डे येथील मराठी शाळेतील मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबली.

  • 07 Feb 2026 03:15 PM (IST)

    07 Feb 2026 03:15 PM (IST)

    तारिक रहमान यांचे ‘ट्रम्प कार्ड’! भारतासोबतच्या संबंधांवर मोठी घोषणा; BNPच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पूर

    शेजारील बांगलादेशात (Bangladesh Election 2026) राजकीय वातावरण तापले आहे. १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर, देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ने (BNP) शुक्रवारी (६ फेब्रुवारी) आपला बहुप्रतिक्षित निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाचे विद्यमान प्रमुख तारिक रहमान यांनी हा जाहीरनामा सादर करताना बांगलादेशच्या भविष्याचा रोडमॅप मांडला. विशेष म्हणजे, या जाहीरनाम्यात त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शैलीत “बांगलादेश फर्स्ट” (Bangladesh First) हे धोरण स्वीकारण्याची घोषणा केली आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचे लक्ष वेधले आहे.

  • 07 Feb 2026 03:10 PM (IST)

    07 Feb 2026 03:10 PM (IST)

    एकनाथ शिंदेंच्या नाशिकच्या गडाला सुरुंग…; बडा नेता सोडणार साथ

    नाशिकच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नाशिक महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके यांची निवड करण्यात आली. उपमहापौरपदी शिंदे गटाचे विलास शिंदे यांची निवड करण्यात आली. सुरुवातीला उपमहापौरपदी मच्छिंद्र सानप यांनी अर्ज केला होता. पण मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिंदेसेनेला उपमहापौरपद देण्याचा आदेश नाशिकच्या भाजप श्रेष्ठींना देण्यात आला.

  • 07 Feb 2026 03:05 PM (IST)

    07 Feb 2026 03:05 PM (IST)

    Ratnagiri ZP Election च्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज; तीन हजार पोलिस तैनात

    जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी (दि. ७) मतदान होणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, निर्भय पणे मतदारांनी घरा बाहेर पडुन मतदान करावे, यासाठी जिल्ह्यात खाकीचा खडा पहारा राहणार आहे. तब्बल साडे ३ हजाराचा पोलिस बंदोबस्त राहणार आहे. हा बंदोबस्त बाहेरून मागविण्यात आला आहे.

  • 07 Feb 2026 02:45 PM (IST)

    07 Feb 2026 02:45 PM (IST)

    सामन्यांचे लाईव्ह टेलिकास्ट आणि मोफत स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा सविस्तर तपशील

    आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ ७ फेब्रुवारी रोजी सुरू झाला आणि पहिल्याच दिवशी क्रिकेट चाहत्यांना काही अविश्वसनीय खेळांचा अनुभव मिळाला. आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ चा शुभारंभ 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. भारत आणि अमेरिका पहिल्या दिवशी त्यांचा तिसरा गट फेरीचा सामना खेळतील. हा सामना संध्याकाळी ७ वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू होईल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया त्यांच्या जेतेपदाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील असेल, तर अमेरिका अपसेट शोधत असेल.

  • 07 Feb 2026 02:35 PM (IST)

    07 Feb 2026 02:35 PM (IST)

    काळाघोडा फेस्टिव्हलमध्ये ई-कचरा रिसायकलिंग! पर्यावरण, आरोग्य व अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरणार जनजागृती

    प्रत्येक वर्षी मुंबईमध्ये काळाघोडा फेस्टिवलचे आयोजन केले जाते. या फेस्टिवलमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी कायमच पाहायला मिळतात. मोबाईल, संगणक, बॅटरी यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारा ई-कचरा हा पर्यावरणासाठी मोठा धोका ठरत असताना, कालाघोडा कला महोत्सवात मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारलेल्या ई-वेस्ट रिसायकलिंग स्टॉलने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या स्टॉलच्या माध्यमातून ई-कचरा रिसायकलिंग किती आवश्यक आहे आणि ते पर्यावरण, आरोग्य व अर्थव्यवस्थेसाठी कसे फायदेशीर आहे, याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.

  • 07 Feb 2026 02:30 PM (IST)

    07 Feb 2026 02:30 PM (IST)

    रातोरात गेम पलटला! ट्रम्पकडून 500 अब्ज डॉलर्सच्या कराराचे ‘रिटर्न गिफ्ट’; अमेरिकेच्या नकाशात PoK भारताचा भाग

    पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांच्यात झालेल्या ऐतिहासिक ‘मदर ऑफ ऑल डील्स’ (Trade Deal) नंतर आता त्याचे राजनैतिक परिणाम दिसू लागले आहेत. अमेरिकेने एक असे पाऊल उचलले आहे, ज्याची कल्पनाही पाकिस्तानने केली नसेल. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने (USTR) एक अधिकृत नकाशा प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये संपूर्ण जम्मू-काश्मीर, लडाख आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) भारताचा भाग असल्याचे स्पष्टपणे दाखवण्यात आले आहे.

  • 07 Feb 2026 02:20 PM (IST)

    07 Feb 2026 02:20 PM (IST)

    आठवणींचा मनमोकळा प्रवास, प्रार्थना-पूजा-अभिजीतची प्रमुख भूमिका; ‘सखे गं साजणी’ पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

    मित्रांसह केलेला प्रवास म्हणजे केवळ ठिकाणं बदलणं नव्हे, तर नाती अधिक घट्ट होण्याचा आणि आयुष्य नव्याने जगायला शिकवणारा अनुभव असतो. हाच अनुभव मोठ्या पडद्यावर मांडणारा ‘सखे गं साजणी’ हा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • 07 Feb 2026 02:15 PM (IST)

    07 Feb 2026 02:15 PM (IST)

    महापौरपदाची सूत्रे हाती घेताच लांडगेंनी पिंपरी-चिंचवडकरांना दिले ‘हे’ मोठे आश्वासन; आता शहरवासियांना दररोज…

    “पिंपरी-चिंचवडमधील शहरवासियांना दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासन तातडीने पावले उचलणार असून, आगामी काळात पाणी, स्वच्छता आणि आरोग्य या तीन मुख्य विषयांवरच आमचा सर्वाधिक भर असेल,” अशी ग्वाही नवनियुक्त महापौर रवी लांडगे यांनी दिली. महापालिकेच्या महापौरपदी निवड झाल्यानंतर आयोजित पहिल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शहरासाठी स्वतंत्र आयुक्तांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही स्पष्ट केले.

  • 07 Feb 2026 02:10 PM (IST)

    07 Feb 2026 02:10 PM (IST)

    बटण दाबले की विनाश! भारत शांततेच्या काळातही क्षेपणास्त्रे ठेवणार ‘रेडी टू फायर’; SIPRI अहवालाने पाकला फुटला घाम

    जागतिक स्तरावर शस्त्रास्त्रांवर लक्ष ठेवणाऱ्या ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ (SIPRI) च्या २०२५ च्या ताज्या अहवालाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. या अहवालानुसार, भारताने आपल्या अण्वस्त्र धोरणात (India Nuclear Doctrine) एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक बदल केला आहे. आतापर्यंत शांततेच्या काळात भारत आपली अण्वस्त्रे (Warheads) आणि क्षेपणास्त्रे (Launchers) वेगळी ठेवत असे. मात्र, बदलत्या भू-राजकीय परिस्थितीमुळे भारताने आता ही शस्त्रे एकमेकांना जोडून सज्ज ठेवण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून कोणत्याही हल्ल्याला काही सेकंदात प्रत्युत्तर देता येईल.

  • 07 Feb 2026 02:05 PM (IST)

    07 Feb 2026 02:05 PM (IST)

    महापौरपदाची सूत्रे हाती घेताच लांडगेंनी पिंपरी-चिंचवडकरांना दिले ‘हे’ मोठे आश्वासन

    “पिंपरी-चिंचवडमधील शहरवासियांना दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासन तातडीने पावले उचलणार असून, आगामी काळात पाणी, स्वच्छता आणि आरोग्य या तीन मुख्य विषयांवरच आमचा सर्वाधिक भर असेल,” अशी ग्वाही नवनियुक्त महापौर रवी लांडगे यांनी दिली. महापालिकेच्या महापौरपदी निवड झाल्यानंतर आयोजित पहिल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शहरासाठी स्वतंत्र आयुक्तांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही स्पष्ट केले.

  • 07 Feb 2026 02:00 PM (IST)

    07 Feb 2026 02:00 PM (IST)

    दुःखाच्या काळात प्रचार योग्य वाटला नाही – मुरलीधर मोहोळ

    पुणे जिल्ह्याची प्रभारी म्हणून माझ्यावर जबाबदारी होती, मात्र मी कुठेही प्रचाराला गेलो नाही. दादा गेल्यानंतर आम्हाला राजकारणात रस नव्हता. निवडणुका येतात आणि जातात, पण दादा गेल्याचं दुःख आमच्या मनात कायम आहे.
    अजित दादा पुणे जिल्ह्यात ३५ ते ४० सभा घेणार होते. राजकारण करायला आयुष्य आहे. अशा दुःखद काळात प्रचार करणे योग्य वाटले नाही. मतदार सुज्ञ आहेत, त्यांना जे करायचे ते करतील. अनेक वर्षे राष्ट्रवादीची सत्ता आहे, पुढे जे होईल ते होईल. मी पहाटे दिल्लीवरून आलो आहे. बुट्टे पाटील यांना कुठल्या कारणासाठी मारहाण झाली, हे पाहूनच प्रतिक्रिया देईन.

  • 07 Feb 2026 01:55 PM (IST)

    07 Feb 2026 01:55 PM (IST)

    ९३ वर्षांच्या छबूबाई भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

    लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे ९३ वर्षांच्या छबूबाई काशिनाथ भुजबळ यांनी चालता येत नसतानाही मतदानाचा हक्क बजावला. वयोमानामुळे हालचाल करणे शक्य नसतानाही त्यांच्या मुलाने त्यांना उचलून मतदान केंद्रापर्यंत आणले आणि व्हीलचेअरवर बसवून मतदान करण्यास मदत केली. छबूबाई भुजबळ यांनी केलेले मतदान लोकशाहीप्रती असलेली निष्ठा आणि कर्तव्यभावना अधोरेखित करणारे ठरले.

  • 07 Feb 2026 01:55 PM (IST)

    07 Feb 2026 01:55 PM (IST)

    क्रिकेट फॅन्ससाठी खुशखबर! T20 विश्वचषक सामना पाहू शकता मोफत

    7 फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून टी 20 विश्वचषक सामने सुरू झाले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर युजर्स हे सामने पाहू शकतात. मात्र यासाठी त्यांना या प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन खरेदी करावे लागेल. जर तुम्हाला जिओहॉटस्टारवर हे सामने मोफत पाहायचे असेल तर तुम्ही जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचे रिचार्ज प्लान खरेदी करू शकता. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला कॉलिंग आणि डेटा ऑफरसह जिओ हॉटस्टारचे सबस्क्रीप्शन मोफत मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला जिओ हॉटस्टारचे सबस्क्रीप्शन विकत न घेता टी 20 विश्वचषक सामने पाहायचे असतील तर तुम्ही जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचे काही स्वस्त रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकता.

  • 07 Feb 2026 01:50 PM (IST)

    07 Feb 2026 01:50 PM (IST)

    वावंजा पंचायत समितीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांची मोठी उपस्थिती

    आज महाराष्ट्रात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. या पार्श्वभूमीवर वावंजा पंचायत समितीसाठी वावंजा गावात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून, विशेषतः महिलांचा प्रतिसाद सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून प्रमुख राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

  • 07 Feb 2026 01:50 PM (IST)

    07 Feb 2026 01:50 PM (IST)

    ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन फसला? कॅनडा-फ्रान्सने उचललं हे मोठं पाऊल

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या ग्रीनलँड विकत घेण्याच्या स्वप्नाला मोठा धक्क बसला आहे. कॅनडा आणि फ्रान्समध्ये ग्रीनलँडमध्ये मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडा (Canada) आणि फ्रान्सने शुक्रवारी (०६ फेब्रुवारी) ग्रीनलँडची राजधानी नुकमध्ये वाणिज्य दूतावास उघडले आहे. दोन्ही देशांचा हा निर्णय ट्रम्प यांच्या धमक्यांना थेट आव्हान मानला जात आहे. तसेच यामुळे ट्रम्प यांचे ग्रीनलँड ताब्यात घेण्याचे स्वप्न भंगणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कॅनडा आणि फ्रान्सने (France) अमेरिकेच्या ग्रीनलँडवर नियंत्रणाविरोधात डेन्मार्कला पाठिंबा देत हा निर्णय घेतला आहे.

  • 07 Feb 2026 01:45 PM (IST)

    07 Feb 2026 01:45 PM (IST)

    माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

    पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बावडा जिल्हा परिषद गटातून हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे निवडणूक लढवत आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. बावडा येथील मतदान केंद्रावर हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील ठाकरे, पुत्र राजवर्धन पाटील आणि पत्नी भाग्यश्री पाटील यांनी मतदान केले.

    अजित पवारांशिवाय निवडणूक

    “मतदान हा लोकशाहीचा लोकोत्सव असतो. दुर्दैवाने अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. अतिशय जड अंतःकरणाने दादांची कायमची गैरहजेरी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत जाणवत आहे. एका बाजूला दुःख आहे, तर दुसऱ्या बाजूला आपले कर्तव्य बजावायचे आहे.

  • 07 Feb 2026 01:45 PM (IST)

    07 Feb 2026 01:45 PM (IST)

    क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूला हृदयविकाराचा झटका, मैदानावरच मृत्यू

    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजपासून आयसीसी टी20 विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा सामना भारताचा वानखेडे मैदानावर होणार आहे. भारतामध्ये प्रत्येक घरामध्ये एक क्रिकेटर असतो. क्रिकेट हे चाहत्यांसाठी मनोरंजनाचे साधन आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त, रस्त्यावरील आणि स्थानिक स्पर्धांमध्ये खेळाडूंना पाहण्यासाठी हजारो चाहते जमतात.

  • 07 Feb 2026 01:42 PM (IST)

    07 Feb 2026 01:42 PM (IST)

    आमदार जयंत पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला

    सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जयंत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ईश्वरपूर नजीक असलेल्या साखराळे या त्यांच्या गावातील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले. रांगेत उभे राहून आमदार जयंत पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चांगले यश मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

  • 07 Feb 2026 01:36 PM (IST)

    07 Feb 2026 01:36 PM (IST)

    अजित पवारांच्या प्रतिमेला अभिवादन करून उमेश पाटील मतदानासाठी रवाना

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील मतदानासाठी रवाना झाले. मोहोळ तालुक्यातील कुरुल गटातून उमेश पाटील हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कुरुल गटात राष्ट्रवादीचे उमेदवार उमेश पाटील विरुद्ध भाजपचे उमेदवार सचिन जाधव यांच्यात थेट लढत होत आहे. दरम्यान, “अजित पवार यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दादांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादीचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. अजित दादांना श्रद्धांजली म्हणून एक मत राष्ट्रवादीला द्यावे,” असे आवाहन उमेश पाटील यांनी केले. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी व्यक्त केली.

     

  • 07 Feb 2026 01:35 PM (IST)

    07 Feb 2026 01:35 PM (IST)

    परीक्षेविना सरकारी नोकरीची संधी! ‘या’ बँकेत भरती जाहीर; जाणून घ्या सविस्तर

    इंडियन बँकेत नोकरी करण्याची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. इंडियन बँकेने 2026 साठी ऑफिसर JMG स्केल-1 आणि क्लर्क पदांसाठी भरती जाहीर केली असून, विशेष म्हणजे या भरतीसाठी लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पात्र उमेदवारांना थेट निवड प्रक्रियेच्या माध्यमातून सरकारी बँकेत नोकरीची संधी मिळणार आहे. चला, या भरतीबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

  • 07 Feb 2026 01:25 PM (IST)

    07 Feb 2026 01:25 PM (IST)

    U19 World Cup जिंकल्यानंतर BCCI ने उघडली खेळाडूंसाठी तिजोरी!

    आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने शुक्रवारी आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ चे विजेतेपद जिंकून सर्वांना आनंद दिला. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करून विक्रमी सहाव्यांदा ट्रॉफी जिंकली. या ऐतिहासिक विजयानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला ७.५ कोटी (₹७.५ कोटी) रोख बक्षीस जाहीर केले.

  • 07 Feb 2026 01:18 PM (IST)

    07 Feb 2026 01:18 PM (IST)

    आठवणींचा मनमोकळा प्रवास, प्रार्थना-पूजा-अभिजीतची प्रमुख भूमिका

    मित्रांसह केलेला प्रवास म्हणजे केवळ ठिकाणं बदलणं नव्हे, तर नाती अधिक घट्ट होण्याचा आणि आयुष्य नव्याने जगायला शिकवणारा अनुभव असतो. हाच अनुभव मोठ्या पडद्यावर मांडणारा ‘सखे गं साजणी’ हा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.हा चित्रपट तीन जिवलग मित्रांच्या प्रवासाभोवती गुंफलेली भावनिक आणि हळवी कथा सांगतो. नुकतंच या चित्रपटाचं अधिकृत पोस्टर प्रेक्षकांसमोर आलं असून, पोस्टरमधूनच मैत्री, प्रवास आणि आठवणींचा मनमोकळा प्रवास अनुभवायला मिळतोय.

  • 07 Feb 2026 01:15 PM (IST)

    07 Feb 2026 01:15 PM (IST)

    बटण दाबले की विनाश! भारत शांततेच्या काळातही क्षेपणास्त्रे ठेवणार ‘रेडी टू फायर’

    जागतिक स्तरावर शस्त्रास्त्रांवर लक्ष ठेवणाऱ्या ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ (SIPRI) च्या २०२५ च्या ताज्या अहवालाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. या अहवालानुसार, भारताने आपल्या अण्वस्त्र धोरणात (India Nuclear Doctrine) एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक बदल केला आहे. आतापर्यंत शांततेच्या काळात भारत आपली अण्वस्त्रे (Warheads) आणि क्षेपणास्त्रे (Launchers) वेगळी ठेवत असे. मात्र, बदलत्या भू-राजकीय परिस्थितीमुळे भारताने आता ही शस्त्रे एकमेकांना जोडून सज्ज ठेवण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून कोणत्याही हल्ल्याला काही सेकंदात प्रत्युत्तर देता येईल.

  • 07 Feb 2026 01:10 PM (IST)

    07 Feb 2026 01:10 PM (IST)

    पीएमपीएलचा कारभार सुधारा, 690 बसेस कुठे आहेत?

    पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) हे नागरिकांसाठी सार्वजनिक सेवेचे साधन न राहता आर्थिक तुटीचे केंद्र बनत चालले असून, या अपयशी कारभाराचा भार थेट पुणे व पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या खिशातून वसूल केला जात असल्याचा गंभीर आरोप माजी पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पीएमपीएमएलच्या वाढत्या तोट्याची तातडीने सखोल चौकशी करून ठोस उपाययोजना राबवण्यात आल्या नाहीत, तर ही लूट थांबणार नाही, असा थेट इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

  • 07 Feb 2026 01:03 PM (IST)

    07 Feb 2026 01:03 PM (IST)

    क्वालालंपूरमध्ये मोदी लाट! 800 कलाकारांचा डान्स

    पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज दोन दिवसांच्या ऐतिहासिक मलेशिया दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. दक्षिण-पूर्व आशियातील भारताचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या मलेशियासोबतचे संबंध आता एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत. विमानतळावर निघण्यापूर्वी पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, हा दौरा केवळ औपचारिक नसून तो संरक्षण, सुरक्षा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘नव्या युगाची’ सुरुवात आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये दोन्ही देशांमधील संबंधांना ‘सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी’चा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिलीच भेट असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले आहे.

  • 07 Feb 2026 01:00 PM (IST)

    07 Feb 2026 01:00 PM (IST)

    इन्स्पेक्टर ते हेड कॉन्स्टेबलपर्यंत 88 पदांची भरती

    NIA ने 2026 साठी इन्स्पेक्टर ते हेड कॉन्स्टेबल अशा 88 पदांची भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असून अंतिम तारीख 21 फेब्रुवारी आहे. पात्र पोलिस व केंद्रीय बलातील कर्मचाऱ्यांना मोठी संधी मिळणार आहे.

  • 07 Feb 2026 01:00 PM (IST)

    07 Feb 2026 01:00 PM (IST)

    अमिषांना झुगारून मतदानावर भर देण्याचा मतदारांचा निर्धार

    खेड वतालुक्यात चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गण असून सर्वत्र निवडणूक वातावरण तापले आहे. मात्र यंदा मतदार केवळ पैशांच्या आमिषाला बळी न पडता उमेदवारांच्या कामगिरीकडे आणि विकासाच्या अहवालाकडे लक्ष देत असल्याची चर्चा सुरू आहे.

  • 07 Feb 2026 12:50 PM (IST)

    07 Feb 2026 12:50 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला; आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटात तणावाचे वातावरण

    आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनिता बुट्टे यांच्या पतीवर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ६ फेब्रुवारी २०२६) रात्री घडली आहे.

  • 07 Feb 2026 12:40 PM (IST)

    07 Feb 2026 12:40 PM (IST)

    अखेर भाजपकडून महापौरपदाची घोषणा, तर उपमहापौर शिवसेनेचे संजय घाडी

    मुंबईतील बीएमसी महापौरपदाच्या निवडणुकीभोवतीचा सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. भाजपाकडून आज (7 जानेवारी) आपला उमेदवार जाहीर केला असून भाजप महिला महापौरपदाच्या उमेदवाराल उभे करण्यात आले. त्यानुसार, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महापौरपदासाठी आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे यांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी जाहीर केली. त्यानुसार, मुंबई महापौरपदासाठी भाजपच्या रितू तावडे यांचं नावे आणि उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांची नावे अंतिम करण्यात आलं आहे.

  • 07 Feb 2026 12:32 PM (IST)

    07 Feb 2026 12:32 PM (IST)

    हिमाचल प्रदेशातील २०० वर्षे जुने गिरद माता मंदिराला आग

    चंबा (हिमाचल प्रदेश): हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील भरमौर परिसरात शुक्रवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. खुंडेल ग्रामपंचायतीच्या गिरद गावातील ऐतिहासिक आणि शतकानुशतके जुने 'गिरद माता मंदिर' भीषण आगीत जळून खाक झाले आहे. या घटनेमुळे स्थानिक भाविकांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.

    हे मंदिर प्रामुख्याने देवदार लाकडापासून बांधलेले असल्याने आगीने अवघ्या काही तासांत रौद्र रूप धारण केले. ग्रामस्थांना आग विझवण्याची संधी मिळण्यापूर्वीच संपूर्ण वास्तू ढिगाऱ्यात रूपांतरित झाली. हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धास्थान नव्हते, तर या प्रदेशाची सांस्कृतिक ओळख आणि ऐतिहासिक वारसा म्हणून ओळखले जात असे. दुर्गम भागात मंदिर असल्याने मदत पोहोचण्यास मर्यादा आल्या. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

  • 07 Feb 2026 12:30 PM (IST)

    07 Feb 2026 12:30 PM (IST)

    राज्यातील 8 शहरांना मिळाले महापौर, उपमहापौर; 6 महापालिकांमध्ये भाजपचा झेंडा

    महापौरपदी समीर राजूरकर यांची निवड झाली आहे. संभाजीनगरचा गड भाजपने राखलेला आहे. शिवसेना विरुद्ध भाजप अशी अटीतटीची लढत संभाजीनगरमध्ये झाली होती. तर समीर राजूरकर हे छत्रपती संभाजीनगर मनपाचे महापौर असतील.

  • 07 Feb 2026 12:20 PM (IST)

    07 Feb 2026 12:20 PM (IST)

    काश्मीरचा पाकिस्तानला शेवटचा सलाम? बारामुल्ला ते श्रीनगर.. रस्त्यावर फक्त एकच घोषणा, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’

    सर्वसाधारण सभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त केले.

Web Title: Zilla parishad and panchayat samiti election live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 07:29 AM

Topics:  

  • Panchayat Samiti Elections

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.