सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीमध्ये, दोघांनी एकमेकांशी अतिशय महत्त्वाच्या विषयांवर गप्पा मारल्या. ‘लाल सिंग चड्ढा’च्या (Laal Singh Chaddha) या पर्फेक्शनिस्ट अभिनेत्याने प्रतिभावान नागराज मंजुळेसोबत काम करण्याची इच्छा या भेटीत व्यक्त केली. सैराट, फॅन्ड्री, बाजी, झुंड अशा अनेक चित्रपटांचा प्रतिभावान दिग्दर्शक नागराज आणि आपल्या प्रत्येक भूमिकेला न्याय देणारा पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर हे एकत्र येऊन एक चांगली टीम तयार होईल.
[read_also content=”किरीट सोमय्यांचा ट्वीट इशारा; अब संजय राऊत की बारी https://www.navarashtra.com/maharashtra/kirit-somayyas-warning-tweet-now-its-sanjay-rauts-turn-nrgm-306090.html”]
यावेळी गप्पांमध्ये नागराज मंजुळे यांनी आमिर खानला रुपेरी पडद्यावर कोणती भूमिका साकारायची आहे याबद्दल विचारले. ज्यावर आमिरने सांगितले की मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट करायचा आहे, कारण तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाने तो खूप मोहित आणि प्रेरित आहे.
दरम्यान, आमिर खानच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे उधाण आणले आहे. चाहते चित्रपटातील प्रत्येक भागाचे भरभरुन कौतुक करत आहेत. अलीकडेच, यातील एक गाणे ‘कहानी’चा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला आणि सर्वच स्तरातील प्रेक्षकांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव केला.
आमिर खान प्रॉडक्शन, किरण राव आणि वायकॉम 18 स्टुडिओज निर्मित ‘लाल सिंग चड्ढा’ मध्ये करीना कपूर खान, मोना सिंग आणि चैतन्य अक्किनेनी देखील आहेत. हा चित्रपट फॉरेस्ट गंपचा अधिकृत रिमेक आहे. लाल सिंग चड्ढा ११ ऑगस्ट २०२२ रोजी रिलीज होणार आहे.