'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिषेक गावकर अडकला लग्नबंधनात, प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरशी बांधली लग्नगाठ
‘सारं काही तिच्यासाठी’ ही झी मराठी वरील प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. सध्या या मालिकेमधील एक अभिनेता त्याच्या लगीनघाईमुळे चर्चेत आला आहे. ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेता अभिषेक गावकर ह्याने नुकतंच सोशल मीडिया स्टार सोनाली गुरवसोबत आपली लग्नगाठ बांधली आहे. सध्या ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतला श्रीनू आणि त्याची गर्लफ्रेंडच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. आज अखेर या रिल स्टार कपलने आपल्या रिअल लाईफमध्ये सात फेरे घेतले आहेत.
‘पुष्पा 2’ ने रिलीजपूर्वी रचला इतिहास; अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने अमेरिकेत केला विक्रम!
‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेता अभिषेक गांवकरने सोशल मीडिया स्टार सोनालीसोबत लग्नगाठ बांधली आहे. आज अखेर दोघंही आज विवाहबद्ध झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांचे चाहते या नव्या जोडीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अद्याप दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर लग्नाचे फोटो शेअर केलेले नाहीत. ‘राजश्री मराठी’च्या इन्स्टाग्राम हँडलवर या दोघांच्याही लग्नाचे फोटो शेअर करण्यात आलेले आहेत. सोनाली आणि अभिषेक या दोघांचे प्रेमविवाह आहे. अखेर त्यांचा आज लग्नसोहळा मालवणात पार पडला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी लग्नगाठ कोकणातल्या मालवणमध्ये घेतली आहे.
काही महिन्यांपूर्वीच अभिषेक आणि सोनालीचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्यानंतर त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. अखेर त्यांचं लग्न थाटामाटात पार पडले आहे. ‘राजश्री मराठी’च्या इन्स्टाग्राम हँडलवर अभिषेक आणि सोनालीच्या लग्नाचे फोटो शेअर करण्यात आलेले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनालीने लग्नात पिवळी आणि गुलाबी रंगाची साडी नेसलेली तर अभिषेकने गुलाबी कुर्ता आणि त्यावर पिवळा शेला घेतलेला आहे. दोघेही लग्नामध्ये महाराष्ट्रीयन लूकमध्ये फारच सुंदर दिसत होते. त्यानंतर रिसेप्शनमधलेही फोटो समोर आले आहेत. त्या फोटोमध्ये सोनालीने जांभळ्या रंगाचा घागरा घातलाय तर अभिषेकने काळा रंगाचा कुर्ता घातलेला दिसत आहे. रिसेप्शनमध्ये दोघांनीही स्पेशल वेस्टर्न लूक केला होता.
अमिताभ बच्चन यांचा फेव्हरेट खेळाडू कोण ? सांगितला न्यूयॉर्कमधला भन्नाट किस्सा
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेमुळे अभिनेता अभिषेक गावकर चर्चेत होता. मालिकेमध्ये अभिषेकने ‘श्रीनू’ही भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतूनही अभिषेकने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. तर, अभिषेक गावकरच्या होणाऱ्या बायकोबद्दल सांगायचे तर, सोनाली गुरव ही सोशल मीडिया एन्फ्लूएंसर आहेत. सोनालीही नेहमीच इन्स्टाग्रामवर विविध मजेशीर रिल्स व्हिडीओ बनवत असते. तिचा सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग असून तिच्या रिल्स तुफान व्हायरल होतात.