Siddharth Chandekar Birthday Wife Mitali Shared Emotional Post
मराठी फिल्म इंडस्ट्रीतला ‘चॉकलेट बॉय’ म्हणून सिद्धार्थ चांदेकरची चाहत्यावर्गात ओळख आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवला आहे. सिद्धार्थचा १४ जून रोजी वाढदिवस आहे. त्याने आपल्या आयुष्यातला हा खास दिवस त्याची बायको आणि अभिनेत्री मिताली मयेकरसोबत आणि जवळच्या मित्र- मैत्रिणींसोबत सेलिब्रेट केला. मितालीने लाडक्या नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थचा वाढदिवस जरीही १४ जूनला असला तरीही मितालीने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी भावनिक पोस्ट दोन दिवसांनी शेअर केली आहे. याचं कारण सुद्धा, मितालीने पोस्टमध्ये चाहत्यांना सांगितलं आहे.
मन्नारा चोप्राच्या वडिलांचे निधन, चोप्रा कुटुंबीयांवर कोसळला दु: खाचा डोंगर
मितालीने नवरोबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, “Happy Birthday, My Love आयुष्यातला वेडेपणा, रात्री उशिरा होणाऱ्या गप्पा, अनियोजित ट्रीप्स आणि घरात एकमेकांसोबत घालवलेले शांत क्षण… अशा माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांमध्ये तू असतोस. तू फक्त माझा नवरा नाहीस… तू माझ्या आयुष्यातली माझी शांती आहेस, माझा जोडीदार आहेस, माझा सर्वात चांगला मित्र आहेस आणि तू माझा सर्वकाही आहेस. माझ्या आयुष्यात तू एकमेव व्यक्ती आहेस. तुझ्याबरोबर असेन तरच संपूर्ण जीवन अर्थपूर्ण आहे.”
“आयुष्यात असे काही दिवस असतात जेव्हा आपण एकमेकांबरोबर पोट दुखेपर्यंत हसतो, तर काही दिवस शांततेत घालवतो कारण, तेव्हा संवाद साधण्यासाठी शब्द पुरेसे नसतात. प्रामाणिकपणे सांगायचं तर, तू माझ्या आयुष्यातील सुंदर क्षणही पाहिले आहेस आणि मला अगदी गोंधळलेल्या स्थितीतही पाहिलं आहेस. महत्त्वाचं म्हणजे, परिस्थिती कशीही असो तू कायम माझ्यावर तेवढंच प्रेम केलं आहेस. तुझ्या वाढदिवशी, मी फक्त धन्यवाद म्हणू इच्छिते… तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात सेफ जागा आहेस. नेहमीच अत्यंत प्रेमळ अन् खंबीरपणे तू माझ्या पाठिशी उभा राहतोस… अजून काय हवं.”
“आपल्या आयुष्यातील सगळी स्वप्नं पूर्ण होवोत, आपल्याला नेहमीच रात्री उशिरा काहीतरी वेगवेगळं खायची इच्छा होवो…, अनावश्यक भांडणं करून, कॉफी शेअर करून आपण असेच कायम एकत्र राहुयात… आय लव्ह यू… हे प्रेम मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. Happy birthday maa…” (उशिरा पोस्ट शेअर केली कारण आम्ही वाढदिवस सेलिब्रेट करण्यात व्यग्र होतो…) हे वाक्य अभिनेत्रीने हॅशटॅगमध्ये लिहिलंय.